आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने बॉलवर लिहिला नंबर, अन् फेकून दिला पाण्यात, पाहा मग काय झाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील एका तरुणीने खरा प्रियकर शोधण्यासाठी एक अजब शक्कल लढवली. तिने आपले नाव आणि नंबर लिहून एक चेंडू फेकून दिला. त्यावर असेही लिहिले, की तुम्हाला हा चेंडू मिळाल्यानंतर मला फोन लावा. तिचा हा प्रयत्न सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अखेर 6 महिन्यानंतर तिला फोन आला. पण यानंतर जे काही झाले, तिला खूप मोठा धक्का बसला.

 

हॅली रॉबिन्सने 6 वर्षांपूर्वी एका सॉफ्टबॉलवर आपले नाव आणि नंबर लिहून सागरात फेकून दिले. जो कुणी हा चेंडू उचलून त्यावरील नंबर वाचणार आणि मला फोन करणार, तोच माझा प्रियकर असे तिने ठरवले होते. दिवस, महिने, आणि वर्षेही निघून गेली. तिला कुणाचाही फोन आला नाही. तो चेंडू कुणाला सापडेल याची अपेक्षा सुद्धा तिने सोडून दिली होती. त्याचवेळी तिला एक फोन आला.

 

मग झाले असे
फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव अॅडम असल्याचे सांगितले. तसेच लवकरात लवकर स्नॅपचॅटवर ये असेही तो मेसेजमध्ये बोलला. स्नॅपचॅटवर त्या व्यक्तीचे नाव agordan 97 असे होते. यात त्या व्यक्तीचे नाव अॅशली असे लिहिले होते. आपण फेकलेला बॉल आपल्या प्रियकराने उचलल्याचे समजून ती अतिउत्साही होऊन स्नॅपचॅटवर ऑनलाईन गेली. यानंतर तिने फोन केला तेव्हा ती शॉक झाली. अॅडम प्रत्यक्षात एक तरुणी होता. 6 वर्षांची प्रतिक्षा संपलीच असे वाटत असताना तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. तरीही तिने हसतमुखाने ही बाब सोशल मीडियावर शेअर केली. तिची ही स्टोरी सध्या व्हायरल होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...