आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळीव कुत्र्याचा सहवास दूर करेल तुमचा तणाव; \'टच थेरपी\'मुळे बरा होतो अस्थमा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी- पाळीव कुत्र्याच्या सहवासात राहिल्याने तुम्ही तणावमुक्त होऊ शकतात. एवढेच नाहीतर तुमचा कुत्रा तुम्हाला आजारातूनही बरा करू शकतो, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले ना, परंतु हे सत्य आहे. कुत्र्यांच्या 'टच थेरपी'मुळे 15 टक्के अस्थमा ठीक होत असल्याचा दावा बीएयूचे प्रा.सुंदरलाल रुग्णालयाचे चेस्ट स्पेशलिस्ट डॉ. एसके अग्रवाल यांनी केला आहे. कुत्र्यांच्या सहवासात राहिल्याने अ‍ॅलर्जीसारखे आजारही बरे होतात.

एका अभ्यासात असे आढळून आले आहे, की कुत्रा हा प्राणी आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवत असतो. एवढेच नाहीतर आपल्याला अपायकारक ठरणार्‍या व्हायरस आरएसव्हीवरही नियंत्रण ठेवत असतो.

कुत्र्याच्या 'टच थेरपी'मुळे आपल्या शरीरात अँडारफिन्स केमिकल तयार होत असते. अँडारफिन्स केमिकलमुळे तणाव, डिप्रेशनसारख्या आजारातून आपली सूटका होते. तसेच शरीरात निर्माण होणारी अ‍ॅलर्जीही नियंत्रणात ठेवली जाते.

काय आहे आरएसव्ही आणि अँडारफिन्स केमिकल...