आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Killing Of Mother Baboon, Lionesse Shows Love And Protectin For Baby Baboon

सिंहीणने आईचा घेतला जीव, मात्र पिल्लावर दाखवले प्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण अफ्रिकेच्या बोत्सवाना प्रदेशातील उत्तरी क्षेत्र सेलिंडा जंगलात छायाचित्रकार एवन सेचिलर आणि लिजा होल्जवर्थने अलीकडेच मृत्यू, भय आणि प्रेम यांचे गुतांगुतीच्या नात्याला आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. कदाचितच कुणी अशी घटना आपल्या कॅमे-यात केली असावी.
उत्तर बोत्सवानाच्या सेलिंडा क्षेत्रातील जंगलात जवळपास 30-40 वानर गोंधळ घालत होते. परंतु ते कुणामुळे तरी घाबरलेले दिसत होते. कारण त्यांच्या मागे दोन सिंहीण लागल्या होत्या. वानर घाबरून पळ काढण्याचा मार्ग शोधत होते.
हा खूपच भयावह सीन होता. एक मादी वानर झाडावरून खाली उतरली आणि पळायला लागली. तेवढ्यात एका सिंहीणने तिला आपल्या जबड्यात पकडले. मादी वानरच्या कुशीत तिचे छोटे पिल्लू होते. सिंहीणने त्या मादी वानराला आपल्या जबड्यात पकडताच तिचा मृत्यू झाला. परंतु तिच्या एका महिन्याचे पिल्लू वाचले आणि सिंहीणने त्याला आपल्या कुशीत घेतले. वानराच्या पिल्लू आपल्या कोमलता आणि कोवळ्या चेह-याने सिंहीणवर जशी जादूच केली. कारण सिंहीण त्याला प्रेमाने गोंजारायला लागली. त्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती दुस-या सिंहीणसोबत भांडायला लागली होती.
पूर्ण प्रसंग बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....