एअर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एअर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एअर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जे.आर.डी. टाटा यांनी 1932 साली टाटा सन्स नावाची कंपनी स्थापन केली. दुसऱ्या महायुद्धानंतर 26 जुलै 1946 रोजी टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया ठेवण्यात आले व ती एक सार्वजनिक कंपनी बनली. याचवर्षी एअर इंडियाने फ्लाइटमध्ये एअर होस्टेस म्हणून तरुणींना नोकरी दिली. युरोपिअन ड्रेस, डोक्यावर कॅप असा युनिफॉर्म एअर होस्टेसना देण्यात आला. त्यानंतर 1960 साली एअर होस्टेसना साडी हा युनिफॉर्म देण्यात आला होता.
एअर इंडियाच्या दिल्ली-मुंबई फ्लाइटची 1946 सालची दुर्मिळ छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी
घेऊन आलो आहोत. लाइफ मॅगझिनमध्ये ही छायाचित्रे प्रकाशित झाली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ही दुर्मिळ छायाचित्रे...
फोटो सौजन्यः लाइफ मॅगझिन