आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aircrft Xg 332 In The Famous Of The Pilot’S Ejection Watched By A Tractor Driver

हृदयाचा ठोका चुकवणा-या छायाचित्रामागील कथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथमदर्शनी हे छायाचित्र नकली वाटेल. मात्र, ब्रिटिश इलेक्ट्रिक एव्हिएशन कंपनीचे हे इलेक्ट्रिक लाइटनिंग एफवन एअरक्राफ्ट प्रत्यक्षात अशा प्रकारे क्रॅश होत जमिनीवर कोसळले होते. दुसर्‍या महायुद्धादरम्यान या कंपनीशी जेट बॉम्बर तयार करण्याबाबत करार करण्यात आला होता. 19 सप्टेंबर 1962 मध्ये घेतलेले हे एक्सजी-332 विमानाचे अखेरचे छायाचित्र आहे, पण असा फोटो कसा घेता येईल, अशीच शंका सर्वांच्या मनात येते.
जिम मीड्स या फोटोग्राफरने तो काढला आहे. तो एक व्यावसायिक फोटोग्राफर असून एअरफील्डजवळच राहत असे. जिमच्या घराजवळ हवाई लँडचे टेस्ट पायलट बॉब सोव्हरे राहत होते. बॉब यांनीच जिमला लाइटनिंगच्या उड्डाणाबद्दल सांगितले होते. त्यामुळे तो विमानाचे फोटो काढण्यासाठी मीड्स कॅमेरा घेऊन तेथे पोहोचला होता. विमान उतरतानाचे फोटो मुलांना दाखवायचे असल्यामुळे त्यांनी जिमला लँडिंगचे फोटो काढायला सांगितले होते. खूप प्रतीक्षेनंतर लाइटनिंग परतले, मात्र त्यात बॉब नव्हते. दुसराच वैमानिक विमान चालवत होता. तेवढय़ात बिघाड झाल्यामुळे विमान कोसळू लागले.
ट्रॅक्टरवर बसलेला 15 वर्षांचा मिक नावाचा मुलगा जिमला तेथून निघण्याचा हट्ट करत होता. प्लेन क्रॅश होण्याच्या दोन सेकंद आधी विमानातून पायलटने उडी मारली होती. सीक्रेट प्रोजेक्ट असल्यामुळे त्या वेळी हा फोटो सार्वजनिक करण्यात आला नव्हता. डेली मिररने हा फोटो छापण्यासाठी मीडला एक हजार पाउंड दिले होते.