आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानापासून ते प्लास्टीक सर्जरीपर्यंत, शोध लावण्यात सगळ्यात पुढे होता भारत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - प्राचीन भारताने ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली होती. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कुतूब मिनारजवळ लावलेला महरोलीचा लोहस्तंभ. गुप्तकाळातील हा लोखंडी खांब कधीही गंजत नाही. पुराणकाळात आपले ऋषी मुनी धर्म-अध्यात्माबरोबरच विज्ञानाचीही साधना करायचे. त्यांनी वैज्ञानिक रिसर्चच्या आधारावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. प्राचीन भारतात झालेल्या अशाच काही संशोधनाबाबत आपण माहिती घेणार आहोत. 

सध्यापेक्षा चांगले होते विमानाचे तंत्र 
- रामायण काळात महर्षी भारद्वाज यांनी यंत्र सर्वस्व नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यात विविध प्रकारच्या यंत्राची निर्मिती आणि त्यांच्या एकूण तंत्राबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणजे वैमानिक शास्त्रही होते. 
- वैज्ञानिक डॉ. वामनराव काटेकर यांनी 'अगस्त्य संहिता'च्या एका एका प्राचीन पांडुलिपीच्या आधारे केलेल्या संशोधनात असे सांगितले होते की, पुष्पक विमान अगस्त्य मुनींनी तयार केले होते. 
- ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलातील 25व्या आणि 26व्या सूत्राच तीन चाकांच्या अशा विमानांचा उल्लेख आहे, जी अंतराळातही उड्डाण घेऊ शकतात. 
- प्राचीन ग्रंथ वैमानिका प्रकारामच्या हवाल्याने संशोधक कॅप्टन आनंद जे बोडास यांनी दावा केला आहे की, त्याकाळची विमाने आजच्या विमानांच्या तुलनेत अधिक मोठी होती. त्याचबरोबर ते डावीकडे आणि उजवीकडे फिरण्याऐवजी मागच्या बाजुलाही सहजपणे उडू शकत होते. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या.. प्राचीन भारतातील अशाच इतर 6 संशोधनांबाबत.. 
 
बातम्या आणखी आहेत...