आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alien Hunters Claim To Found Gautama Buddha Statue On Mars

मंगळावर आहे गौतम बुद्ध यांचा पुतळा, एलियन हंटर्सने केला दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलियन हंटर्सच्या टीमने मंगळ ग्रहावर गौतम बुद्ध यांचा पुतळा असल्याचा दावा केला आहे. नासाच्या मार्स रोव्हरने पाठविलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करुन हा दावा करण्यात आला आहे. एलियन हंटर्स टीमचे स्कॉट सी वॅरिंग यांनी सांगितले, की सूर्यमंडळातील या तांबड्या ग्रहावर जिवसृष्टी असल्याचा हा पुरावा आहे. दरम्यान, नासाने याबाबत काही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
स्कॉट सी वॅरिंग यांनी सांगितले, की एलियनशी संबंधित कोणतीही माहिती नासाला जाहीर करायची नाही. त्यांना या बाबी लपवून ठेवायच्या आहेत. पण मार्स रोव्हरने पाठविलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये हे सिद्ध झाले आहे, की मंगळावर जिवसृष्टी आहे. यापूर्वी मंगळावर पिरॅमिड सारखी आकृती दिसल्याचा दावा करण्यात आला होता.
पुढील स्लाईडवर बघा, मंगळावर दिसला रहस्यमय जीव.... बघा पिरॅमिडचे छायाचित्र...