(रशियन फोटोग्राफर सेनिया रायकोवा याने काढलेले फोटो)
छान सुंदर श्वान असेल तर त्याच्या पाठिवरून हात फिरवल्याशिवाय, त्याला गोंजरल्याशिवाय राहावत नाही. तोही
आपल्या जिव्हाळ्याला प्रतिसाद देत शेपटी हलवतो, अंग शहारतो, डोळे बारीक करतो नाही तर जिभेने चाटायला प्रयत्न तरी करतो. आपल्या प्रेमाला अगदी सहजपणे मिळालेला प्रतिसाद बघून आपणही गहिवरुन जातो. असे हे नाते पुढे वाढत जाते.
रशियाचा 20 वर्षीय फोटोग्राफर रेनिया रायकोवा (Ksenia Raykova) याने श्वानांचे सुंदर फोटो घेतले आहेत. यातील श्वान देखणे तर आहेच पण त्यांच्या कलाबाजी बघितल्या तर नजर खिळून राहते. यातील काही फोटो तर रेनिया याने तो अगदी 14 वर्षांचा असताना टिपलेले आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, रेनिया रायकोवा याने कॅमेऱ्यात कैद केलेले श्वानांचे अप्रिम फोटो...