आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazing: चिमुकल्यांनी त्रास देऊनही मुळीच चिडले नाहीत हे डॉगी, पाहा 19 छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डॉगीसह एक चिमुकली)
जास्तीत जास्त लोकांचा कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळण्यावर भर असतो. कुणी कुत्रा पाळतात, तर कुणाला मांजर, ससा किंवा पोपट, चिमणी यांना आपल्या घरात ठेवणे पसंत असतं. हळूहळू या पशूपक्ष्यांसह एक वेगळंच भावनिक नातं निर्माण होतं. हे पशूपक्षी आपल्या घरातील एक अविभाज्य भाग बनतात. हे प्राणीसुद्धा एखाद्या मनुष्याप्रमाणे आपलं म्हणणं ऐकतात.
घरात जर एखादे लहान मुल असेल तर त्यांच्यासोबत त्यांची घट्ट मैत्री निर्माण होते. निष्पाप मुलांसोबत ते भरपूर धमालमस्तीसुद्धा करतात. अगदी या चिमुकल्यांनी त्यांना त्रास दिला तरीदेखील ते त्यांच्यावर चिडत किंवा रागावत नाहीत. जणू या चिमुकल्यांची भाषा या प्राण्यांना समजते. अलीकडेच एक व्हिडिओ समोर आला होता, त्यामध्ये एक डॉगी रडत असलेल्या मुलाला खेळणे देऊन शांत करताना दिसतो. यावरुन प्रेम, वात्सल्यामुळे प्राणी आणि मनुष्यात एक वेगळाच बंध निर्माण होतं, हे दिसून येतं.
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला चिमुकल्या मुलांसोबतची पेट्सची अशीच अमेझिंग छायाचित्रे दाखवत आहोत. यामध्ये लहानगी मुले आणि डॉगी यांच्यातील जबरदस्त बाँडिंग बघायला मिळते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा डॉगी आणि चिमुकल्यांची मैत्री...