आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amazing: Chicago L Is World\'s Most Complicated Networks Of Metro Train

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भयावह ट्रॅकवर धावते शिकागोची मेट्रो ट्रेन, सर्वात कॉम्पलिकेटेड आहे हे नेटवर्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका, जपान, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनसह अनेक देशांतील शहरांत मेट्रो रेल्वे चालते. जपान अमेरिका या दोन्ही देशांत मात्र १९४० आणि १९५० च्या दशकात मेट्रो रेल्वे चालू झाल्या. वाहतुकीच्या या क्षेत्रात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जागेची उपलब्धता असणे महत्त्वाचे असते. मात्र, तीच बाब अवघड बनली आहे. या देशात मेट्रो रेल्वेमार्गामुळे अनेक बदल करण्यात आले. मोठ्या प्रयासाने जागा मिळवून मार्ग तयार करण्यात आले. यात शिकागोमधील मेट्रोचा नेटवर्क अधिक गुंतागंुतीचा आणि कठीणसुद्धा आहे.
याला तेथे शिकागो "एल' असे म्हटले जाते. याचे संचालन शिकागो ट्रांझिट सिस्टिम करते. ३०० किमीहून अधिक लांब अंतराच्या नेटवर्कमध्ये १४५ स्टेशन येतात आणि लाइन्स आहेत. यात उपनगरेही येतात. या ट्रॅकचे वैशिष्ट्य असे की, येथे काही ठिकाणे अशी आहेत, जेथे खालून कार आणि काही फूट अंतरावरून मेट्रो जाते. येथील मेट्रोच्या मार्गावर काही वळणे कमी जागेत तयार करण्यात आली असून तेथे वेग कमी करावा लागतो. कारण जागाच कमी असल्याने योग्य वळण देता आलेले नाही. असे असूनही शिकागो एलच्या संचालनाच्या कामगिरीचे रेकॉर्ड चांगले आहे.
अमेरिकेतील सर्वात मोठी परिवहन यंत्रणा हीच असून लाख लोक येथून प्रवास करतात. या नेटवर्कवर १३५६ रेल्वे धावतात. त्या सर्व स्थानकांवरून जातात आणि त्यांच्या २२५० फेऱ्या होतात. प्रवाशांसाठी अगदी सकाळपासूनच सुरू होणारी आणि रात्री उशिरापर्यंत धावणारी ही रेल्वेसेवा लोकांना खूप आवडते. याचे संचालन करणारी शिकागो ट्रांझिट कंपनी विशेष अॅथॉरिटी आहे. ती या सेवेतील सुधारणा किंवा बदलासंबंधी निर्णय स्वत: करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या भयावह ट्रॅकची छायाचित्रे...