आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत ऑक्टोपसचा स्वाद चाखताना देखणी युवती, VIDEO मध्ये बघा कस्सा खाल्ला ऑक्टोपस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- एक कोरियन मुलगी जिवंत ऑक्टोपस खाताना.)
जग विविधतेने भरले आहे. कपडे, खाद्य, भाषा, परंपरा अशा अनेक विविधता या जगात आढळून येतात. यातील खाद्यातील विविधता जरा मनोरंजक आहे. काही लोक केवळ शाकाहारी असतात. ते मांसाला स्पर्शही करीत नाहीत. तर काही शाकाहारी आणि मांसाहारी असे दोनही असतात. यात भारतीय लोक मोडतात. पश्चिमेकडील लोकांचा विचार केला तर ते खरे मांसाहारी असतात. त्यांच्या जेवणात शाकाहार बराच कमी असतो.
परंतु, चीन, व्हिएतनाम, कोरिया, जपान आदी देशांचा विचार केला तर तेथील लोकांचा आहार फार विचित्र आहे. जिवंत बेडूक, ऑक्टोपस, साप आणि वेगवेगळ्या प्रकारचे किडे येथे चविने चाखले जातात. त्याला लोकांची मोठी पसंती लाभते. कोरियात तर ऑक्टोपस खाण्याची पद्धत आहे. येथे याला संनाक्जी (Sannakji) असे म्हटले जाते. काही लोक जिवंत ऑक्टोपस खाणेही पसंद करतात.
भारतातील ओडिशा प्रांतातील एका व्यक्ती साप खाण्याच्या सवईमुळे चर्चेत आला आहे. अशा लोकांना बघितल्यावर आपल्याला किळसवाणे वाटू शकते. पण त्यांच्यासाठी ती चविष्ट डिश असते.
पुढील स्लाईडवर बघा, लोक काय काय खाऊ शकतात...आणि जिवंत ऑक्टोपस खातानाचा एका देखण्या युवतीचा व्हिडिओ...