आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Lion 'selfies' Show Scary Moment Predator Makes A Kill

आफ्रिकेतील सिंहांचे Selfie, फोटोग्राफरने साहसीपणे क्लिक केले छाव्यांचे भाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात क्रूर प्राण्यांपैकी एख अशलेल्या सिंहाच्या जवळ जायलाही सामान्यपणे प्रत्येकाला भीती वाटत असते. त्याचे कारण म्हणजे क्षणात एखाद्याची शिकार करण्यात सिंह तरबेज असतात. पण याच क्रूर प्राण्याचे काही असेही चेहरे असतात जे समोर आल्यानंतर प्रत्येकाला भावत असतात. आता हेच फोटो पाहा. क्रिएटिव्ह फोटोग्राफर हँस लोकनर यांनी आफ्रिकेच्या कल्हारी डेझर्टमध्ये हे फोटो क्लिक केले आहेत.
(हँस लोकनर यांनी क्लिक केलेले फोटो)

हँस लोकनर यांनी अत्यंत चलखानी हे फोटो काढले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या गाडीजवळ सुमारे एका वर्षापेक्षाही कमी वय असणारे सिंहाचे 6 बछडे होते. त्यांनी फोटो काढण्यासाठी कॅमेरा तयार केला आणि गाडी सुरू करताच सिंह मागे धावू लागले तेव्हा फोटो क्लिक केले. त्यात मला सर्वाधिक आवडलेले फोटो म्हणजे सिंहाचे सेल्फी. कारण हे फोटो पाहिल्यानंतत सर्वात आधी असे भासते जणू सिंहांनी स्वतःच त्यांचे हे फोटो क्लिक केलेले असावे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लोकनर यांनी क्लिक केलेले काही PHOTOS