आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 18 फुट शार्कने सीलला उचलून-उचलून आपटले, नंतर केली शिकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केपटाऊन- समुद्रातील प्राण्यांमध्ये क्रूरतेच्या बाबतीत शार्कला कुणीच पछाडू शकत नाही. अलीकडेच या क्रूरतेची घटना दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये समोर आली. केपटाऊनच्या समुद्र किना-यावर 18 फुट लांब एका शार्कने सीलची शिकार केली. शिकार करण्यापूर्वी त्याने सीलला अनेकदा पाण्यामध्ये उचलून-उचलून खाली आपटले. सीलने वारंवार त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र शार्कने त्याला आपला शिकार बनवूनच सोडले.
या संपूर्ण घटनेचे फोटो 62 वर्षीय फोटोग्राफर हॅरी एगेन्स यांनी टिपले. ते शार्कपासून केवळ 30 फुट अंतरावर उभे होते. त्यांना सांगितले, की शार्कने मोठ्या सानधानीने सीलची शिकार केली. त्यासाठी त्याने सीलला आधी त्याच्या ग्रुपपासून वेगळे केले आणि त्यानंतर त्याला आपल्या जबड्यात पकडले. मात्र यादरम्यान सीलने सतत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. परंतु तो अपयशी ठरला. फोटोग्राफर हॅरी एगेन्स 10 यार्ड अंतरावरून एका बोटीवर होते आणि संपूर्ण घटना त्यांनी बोटीमधूनच क्लिक केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शार्क आणि सील यांच्यातील शिकारीची लढाई...