(फिनिक्समध्ये रेल्वे ब्रिजच्या खालून जाणारे विमान)
तसेत पाहता रेल्वे पुलाच्या खालून जाते, परंतु फिनिक्स इंटरनॅशनल एअरपोर्टवर टॅक्सीवेचा रनवे अशाप्रकारे बनवण्यात आला आहे, या रनवेवरून रेल्वे धावते. 30 मीटर उंच पुल उत्तर आणि दक्षिण रनवेला जोडतो. फिनिक्स स्काय हॉर्बर इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल-4पर्यंत लोकांना पोहोचणे सोपे व्हावे म्हणून डिसेंबर 2008मध्ये तेथे स्काय ट्रेनची योजना बनवण्यात आली. एप्रिल 2013मध्ये त्याचा टप्पा सुरु झाल्यानंतर डिसेंबर 2014मध्ये टर्मिनल 2-3पर्यंत स्काय ट्रेन पोहोचवण्यात आली.
स्काय ट्रेनपूर्वी प्रवाशांना टर्मिनलपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्वी तिथे बस चालू होत्या. परंतु त्यापासून ध्वनी तसेच वायू प्रदूषण होत होते. स्काय ट्रेन प्रवाशांसाठी जास्त सुविधाजनक मानण्यात आली आहे. हे जगातील पहिले ठिकाण असे आहे, जिथे टॅक्सिवे रनवेच्या वरून रेल्वे सिस्टम काम करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अनोख्या रनवे आणि रेल्वे ट्रॅकचे फोटो...