आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING: ही भारतीय तरुणी एकटी फिरतेय जगभरात, क्लिक केले असे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भारतीय ट्रॅव्हलर निकिताने नियाग्रा फॉल्सचा हा फोटो क्लिक केला आहे. इनसेटमध्ये ट्रॅव्हलर निकिता)

नवी दिल्ली-
भारतच्या मध्यप्रदेशची रहिवासी 24 वर्षीय एका ट्रॅव्हलरने निसर्गाचा करिश्मा संबोधल्या जाणा-या नियाग्रा फॉल्सचे सुंदर फोटो कैद केले आहेत. भोपाळची निकिता कोठारी सध्या सोलो ट्रॅव्हलिंग (एकटी यात्रेकरू) करत आहे आणि परदेशातून फोटो पाठवत आहे.
नियाग्रा फॉल्स अमेरिका आणि कॅनाडाच्या सीमेवर स्थित आहे. हा फॉल्स पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी गर्दी करतात. निकिताने सांगितले, की तिने हा फॉल्स अमेरिकन आणि कॅनाडिअन या दोन्ही बाजूंनी पाहिला आणि फोटो क्लिक केले. नियाग्रा फॉल्सला जवळून पाहण्यासाठी क्रूजवर प्रवास करावा लागतो. क्रूज फॉल्सच्या अगदी जवळ घेऊन जातो. पाण्याच्या लाटांनी आणि फवा-यांनी शरीर ओलेचिंब होऊन जाते. त्यापासून वाचण्यासाठी लोक रेनकोट परिधान करतात.
'क्वीन'च्या कंगनाप्रमाणे केली ट्रॅव्हलिंग-
भोपाळच्या ट्रॅव्हलरने divyamarathi.comला सांगितले, की ही तिची पहिला ट्रिप होती आणि त्यासाठी तिला खूप हिम्मत दाखवावी लागली. निकिताच्या सांगण्यानुसार, हा प्रवास काहीसा 'क्वीन'च्या कंगनाप्रमाणे होता. तिने सांगितले, की पुढील दिवसांत तिला प्रत्येक खंडाचा प्रवास करण्याची इच्छा आहे. निकिता मास कम्यूनिकेशनमध्ये क्षेत्रात काम करत आहे.

दोन देश कसे ठेऊ शकतात असे सौंदर्य-
निकिताने सांगितले, सुंदर फॉल्सच्या जवळ रेनबोसुध्दा दिसते. येथे मोठ-मोठे दगडे आणि झाडे-झुडपेसुध्दा लावण्यात आले आहेत. तिने सांगितले, की जसे-जसे ती फॉल्सच्या जवळ गेली तेव्हा पाण्याचा अद्भूत आवाज तिच्या कानावर पडला. निकिताने प्रश्न केला, हे एका आश्चर्याचा भाग होता, दोन वेगवेगळे देश या फॉल्सचे सौंदर्य कसे टिकवून ठेऊ शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निकिता आणि फॉल्सच्या सौंदर्याचे काही खास PHOTOS...