आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने दाखवली व्हिएतनामच्या होइ एन सिटीमधील लोकांची अशी LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॉर्वेचा रहिवासी फोटोग्राफर रेहानने अलीकडेच व्हिएतनामचे ऐतिहासिक शहर होइ एनचे काही छायाचित्रे टिपले आहेत. या छायाचित्रांमध्ये त्याने येथे राहणा-या लोकांचे आयुष्य दाखवले आहेत. काही छायाचित्रांत पिवळ्या रंगाने रंगलेल्या भिंतीसमोरून जाणारे लोक दिसतात तर काही छायाचित्रांत मच्छीमा-यांच्या नावेवर सवार होऊन मासे पकडणारे लोक दिसतात. तसेच एक जेष्ठ महिला हॅट घालून चेहरा लपवताना दिसतेय.
फोटोग्राफर रेहान व्हिएतनामला ओपन एअर स्टुडिओ मानतो. त्याने व्हिएतनामशी निगडीत काही फोटो पुस्तकांच्या रुपात संग्रहित केले आहेत, या फोटोंची खूप प्रशंसा केली जात आहे. रेहाननुसार, येथे खूप सुंदर समुद्र आहेत. शिवाय शहरांतील जास्तित जास्त भिंती पिवळ्या रंगाने रंगलेल्या आहेत. या लोकांना आकर्षित करतात. तसेच, धान्यामध्ये बनवलेल्या रस्तासुध्दा तुम्हाला आकर्षित करतो, या रस्त्यावरून आरामात सायकल चालवली जाऊ शकते.
रेहानने सांगितले, की होइ एनपासून काही अंतरावर ट्रा क्यू नावाचे एक गाव आहे. तिथे एकूण 100 कुटुंब राहते. तरीदेखील हे लोक सर्व प्रकारच्या भाज्या उगवतात. रेहानच्या सांगण्यानुसार, येथे मे आणि सप्टेंबरच्या मध्ये खूप सुंदर सूर्यास्त पाहायला मिळतो, हा नजारा एखाद्या फोटोग्राफरसाठी शानदार असतो. यावेळी आकाशात अनेक रंग रंगताना दिसतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रेहानने क्लिक केलेल्या व्हिएतनामच्या होइ एनमधील लोकांचे आयुष्य...