आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भूकेल्या सिंहाने हरणावर घातली झडप, पाहा कसा होता थरारक नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेच्या कगलागडी ट्रान्सफ्रॉन्टियर पार्कमध्ये एका भूकेल्या सिंहाने हरणाला शिकार बनवले. हरिण तहान भागण्यासाठी पाण्याच्या तलावाजवळ येत होते. येथे आधीर सिंह बसलेला होता. या घटनेचे फोटो फोटोग्राफर हॉवर्ड आणि मॅरिआने बर्गरने कैद केले आहेत.
काय म्हणाला फोटोग्राफर...
74 वर्षी फोटोग्राफर बर्गर म्हणाले, 'आम्ही पोलनत्सवा वॉटरहोलच्या जवळ दिवसभर बसलेलो होतो आणि विचार करत होतो, की जंगली प्राण्यांचे सुंदर क्षण कॅमे-यात टिपावे. मी पाहिले, की ब-याच वेळापासून एक सिंह तिथे झोपलेला होता. कदाचित तो भूकेला असेल आणि शिकारीसारखी तलावाजवळ बसलेला होता. त्यादरम्यान तलावाजवळ एक हरिण आले. त्यावेळी सिंहाने वेळ न घालवता, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.'
फोटोग्राफरने सांगितले, की हरिण येताना पाहून सिंहला आनंद झाला. त्याचदरम्यान हरणाची नजर सिंहावर पडली. त्याने तिथून धूम ठोकण्याचा विचार केला. परंतु सिंहाने त्याच्यावर हल्ला करून त्याची शिकार केली. फोटोग्राफर बर्गरने सांगितले, मला झोपलेल्या सिंहाचे फोटो क्लिक करायचे नव्हते. मला पाणी पिणा-या प्राण्यांचे फोटो काढायचे होते. त्याचदरम्यान ही घटना घडली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिंहाने कशी हरणाची शिकार...
बातम्या आणखी आहेत...