आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: पाहा भूतकाळातील 28 अशी छायाचित्रे जी यापूर्वी तुम्ही कधीही बघितली नसावीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - ज्युडो क्लासच्या सहका-यांसोबत ओसामा बिन लादेन, (उजवीकडे वर) - मर्लिन मुनरो आणि सॅम्मी डेविस ज्युनिअर,  हॉलिवूडचे विनोदी अभिनेते चार्ली चॅपलिन आणि महात्मा गांधी (उजवीकडे खाली) - Divya Marathi
डावीकडे - ज्युडो क्लासच्या सहका-यांसोबत ओसामा बिन लादेन, (उजवीकडे वर) - मर्लिन मुनरो आणि सॅम्मी डेविस ज्युनिअर, हॉलिवूडचे विनोदी अभिनेते चार्ली चॅपलिन आणि महात्मा गांधी (उजवीकडे खाली)
भूतकाळाकडे वळून पाहणे एक रोमांचक अनुभव असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे गतकाळातील छायाचित्रे. ही छायाचित्रे आपल्याला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जातात. या छायाचित्रांच्या माध्यमातून अनेक अनभिज्ञ गोष्टी आपल्याला कळतात. मग ती लायसन्स नसल्यामुळे बिल गेट्स यांना झालेली अटक असो, किंवा महात्मा गांधी आणि चार्ची चॅप्लिन यांची भेट. गतकाळातील अनेक गोष्टींचा उलगडा आपल्याला छायाचित्रांच्या माध्यमातून होत असतो.
आता वरीलच छायाचित्र बघा ना. लाल वर्तुळात दिसणारी ही व्यक्ती ओसामा बिन लादेन आहे. दहशतवादाचा क्रूर चेहरा राहिलेल्या लादेनला खेळाची आवड होती. लादेनचे वरील छायाचित्र ज्युडो क्लासमधील आहे. आपल्या सहका-यांसोबत लादेन दिसतोय. युवा लादेनला बघून त्याच्या सहका-यांना कधी वाटले असेल का, की भविष्यात हा तरुण दहशतवादी बनेल.
आज आम्ही तुम्हाला भूतकाळातील अशीच काही छायाचित्रे दाखवत आहोत. स्टीव जॉब्स आणि बिल गेट्स गप्पा मारतानाचे छायाचित्र असो किंवा हॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन रॉबिन विलियम्स यांचे चिअर लीडर्सच्या रुपात डान्स करतानाचे छायाचित्र, हे क्षण तुम्ही कदाचितच कधी पाहिले असावेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा भूतकाळातील खास छायाचित्रे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे...
बातम्या आणखी आहेत...