नॉर्वेतील गेरअंगरजोर्डमधील डोंगर अचंबित करणा-या शिळांसाठीच ओळखले जातात. सरळसोट डोंगरांच्या तुलनेत येथील डोंगर शिळांमुळे वेगळे दिसतात. या शिळांची घडण वेगळी असून पाहताच असे वाटते की, वरून लाव्हा रस उफाळून आला आणि त्यांची रचनाच अशा प्रकारची झाली आहे; परंतु असे लाव्हामुळे घडले नसून ते टणक दगडच आहेत.
तज्ज्ञांच्या मते, काही ठरावीक वर्षांच्या काळात येथील डोंगरांचे रूप बदलत जाते. याला या शिळासुद्धा कारणीभूत असून येथून जवळच जोर्ड नावाचे ठिकाण आहे. याला युनेस्कोकडून जागतिक वारसा घोषित करण्यात आले आहे. यामुळे नॉर्वेतून येणारे विदेशी पर्यटक या स्थानाला खूप पसंत करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शिळांची आकर्षक छायाचित्रे...