आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Sci Fi Dine In Theater Restaurant Where People Sit In Car In US

AMAZING PHOTOS: येथे कारमध्ये बसून करतात जेवण, थाटात पाहतात सिनेमे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फ्लोरिडामध्ये स्थित अनोखे रेस्तरॉ)
वाशिंग्टन- फ्लोरिडाच्या बे लेकच्या डिज्नी हॉलिवूड स्टुडिओमध्ये एक असे रेस्तरॉ आहे, जिथे लोक कारमध्ये बसून जेवण करू शकतात. सोबतच थाटात सिनेमेसुध्दा बघू शकतात. साई-फाई डाइन इन थिएटर रेस्तरॉच्या रुपात याची ओळख आहे. जेवण करताना ग्राहकांना स्क्रिनवर जूने सिनेमे दाखवले जातात.
रेस्तरॉच्या प्रवेशव्दार अशा पध्दतीने बनवण्यात आले आहे, की त्यामध्ये प्रवेश करताच एखाद्या थिएटरमध्ये प्रवेश केल्याचा भास होतो. येथे असलेल्या कारमध्ये व्हाइट टायर लावण्यात आले आहेत, त्यांची नंबर प्लेट 1950च्या असल्याचे दिसले. रेस्तरॉच्या छताला रात्रीच्या अवकाशाचा लूक देण्यात आला आहे. एका भिंतीवर दक्षिण कॅलिफोर्निया दाखवण्यात आला आहे.
रंजक गोष्ट म्हणजे, येथे जेवण सर्व्ह करणारे वेटरसुध्दा विविध पोशाखात दिसतात. कुणी पोलिस अधिका-याच्या लूकमध्ये असतात, ते विना पैसे रेस्तरॉमध्ये घुसलेल्या लोकांचा शोध घेतात.
हे रेस्तरॉ मे, 1991मध्ये उघडण्यात आले आहे. परंतु एका वर्षामध्ये याची लोकप्रियता जास्त वाढली आहे. पीक पीरियड्समध्ये येथे एका दिवसात जवळपास 2200 लोक जेवण करण्यासाठी येतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अनोख्या रेस्तरॉचे खास PHOTOS...