(स्कोजन गुंफेचे एक छायाचित्र)
जगात अनेक सुंदर ठिकाणे आहेत आणि या ठिकाणांना पाहण्यासाठी फार दूरवरून पर्यटक या ठिकाणांना भेटी देतात. यातील काही ठिकाणे तर त्यांच्या आश्चर्यांमुळेच प्रसिध्द आहेत. असेच एक ठिकाण आहे स्लोबेनियाची स्कोजन गुंफा. स्कोजन गुहेमध्ये सर्वात मोठी भुमिगत दरी, धबधबा एवढेच नव्हे तर एका अद्भूत जगामध्ये ही गुंफा आपल्याला घेऊन जाते. ही गुहा युरोपातील सर्वात मोठी गुहा आहे.
या गुहेच्या आत स्केलेक्टाईट आणि स्टेलेग्माईटचे स्ट्रक्चर आहे जे दिसायला खुपच सुंदर आहेत. रेका नदी येथे अचानक गायब झाल्याने स्कोजन गुहा निर्माण झाली. रेका नदीचा येथे सुरूवातीचा भाग दिसतो. यानंतर ही नदी गुहा आत जवळपास 34 किलोमीटरपर्यंत वाहात जाते. नदीचे पाणी आणि गुहेचे सौंदर्य प्रत्येकास मोहून टाकते.
पाहुयात या गुहेची काही खूपच आकर्षक, मनमोहक छायाचित्रे....