आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Story Of Jaw Cancer Model Pregnant Elizaveta Bulokhova

PHOTOS: कॅन्सरने ग्रस्त मॉडलने केले फोटोशूट, अशा अवस्थेत बाळाला दिला जन्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कन्सर पिडित मॉडेल)
ओटावा- प्रेग्नेंसीमध्ये अनेक सामान्य महिलांना समस्या निर्माण होतात, मात्र एखादी महिला प्रेग्नेंसीदरम्यान कॅन्सरने ग्रस्त असेल तर तिच्या समस्या सांगण्याची गरजच नाहीये. कॅनाडाची एक मॉडेल एलिजावेटा बुलोखोवा मागील वर्षी अशाच परिस्थितीचा सामना करत होती. मॉडेल पती रोमन ट्रोबेट्सकोईसोबत एम्सटर्डममध्ये सुट्या घालवण्यासाठी गेली होती, तेव्हा तिला तोंडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तिला गर्भात वाढणा-या मुलाचा गर्भपात करण्यास सांगितले आणि त्यानंतर तिच्यावर केमोथेरपी करून उपचार केले जाणार होते. तिने गर्भपात केला नाही तर मुलाचा जीव जाईल असे डॉक्टरांना तिला सांगितले होते.
परंतु बुलोखोवाने सांगितले, 'माझे बाळ खूप अॅक्टिव्ह होते आणि मला जाणीव व्हायची, की ते माझ्याशी बोलत आहे.' महिलेने डॉक्टरांच्या विपरित सल्ल्यानंतर ठरवले, की पोटात वाढणा-या बाळाला जन्म द्यायचा. त्यानंतर बाळाला सिझेरिअन पध्दतीने जन्म देण्यात आला. बाळाच्या जन्मानंतर महिलेला कॅन्सरचा उपचार घेत असताना जबड्याचा मोठा भाग काढावा लागला.
आता ती कर्करोगातून बरी होत आहे. तिने अलीकडेच मॉडेलिंग केली आणि त्याचे काही फोटो इंटरनेटवर खूप पसंत केले जात आहेत. एका सोशल वेबसाइटवर तिचे नवीन फोटो 4 दिवसांत 3 लाख वेळा पाहिल्या गेले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कर्करोगाने पिडित असलेल्या या मॉडेलचे NEW PHOTOS...