आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing View Of City Of Canals Amsterdam In Night

PHOTOS: रात्रीच्‍या अंधारात बहुरंगी कालव्यांमुळे खुलते या शहराचे सौंदर्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅमची कालव्यांचे शहर अशी जगभरात ओळख आहे. याचे कारण, अॅमस्टल नदी शहरातून वाहते. त्या नदीतून कालवे काढण्यात आलेले आहेत. अशा कालव्यांतील वाहत्या पाण्यामुळे शहराच्या सौंदर्यात भरच पडते. इमारतीतून येणारा प्रकाश त्या पाण्यात परावर्तित होत असल्‍यामुळे सौंदर्य खुलुन दिसते. काही घरे, हॉटेल्स आणि रिसाॅर्ट्स कालव्या शेजारी आहेत.
हे कालवे इतके स्वच्छ आहेत की, नागरिक यातून नौकाविहाराचा आनंद घेतात. आठवड्यातून तीन वेळा अॅमस्टल नदीचे पाणी कालव्यात सोडले जाते. त्यामुळे शहरातील कचरा शहराबाहेर वाहून जातो. शहराच्या १६५ चौरस किमी परिसरापैकी ५३ चौरस किमी पाणीच वाहताना दिसते. अॅमस्टरडॅमला इको-फ्रेंडली शहराचा दर्जा मिळालेला आहे. येथील लोक शहरात सायकलचा वापर प्रामुख्याने करतात. शहरात कोणतीही विकास योजना सुरू करण्याचे ठरले तर पर्यावरणाचा प्रथम विचार केला जातो.
पुढील स्‍लाईडवर पाहा अॅमस्टरडॅम शहराचे सौंदर्य...