आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • American Massage Therapist Undergone Surgery To Get Third Breast

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्हीवर झळकण्यासाठी काय पण... 12 लाख रुपये खर्च करुन जोडले तिसरे ब्रेस्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लोरिडा - सेलिब्रिटी बनण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यासाठी काही लोक जीवतोड मेहनत करतात तर, काही जगावेगळ्या करामती करुन सेलिब्रिटींच्या यादीत येण्याचा चंग बांधतात. अमेरिकेतील एका मसाज थेरपिस्टने दुसरा मार्ग निवडला आहे. तिने शस्त्रक्रिया करुन तिसरे ब्रेस्ट जोडून घेतले आहे. फ्लोरिडाची रहिवासी असलेल्या 21 वर्षीय जॅस्मिन ट्रायडवेलला (नाव बदलेले आहे) टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये भाग घ्यायचा आहे आणि सेलिब्रिटी म्हणून मिरवायचे आहे. त्यासोबतच तिला पुरुषांचे आपल्याकडे लक्ष जाऊ नये असेही वाटते. तिला कोणासोबत डेटवर जाण्याची इच्छा नाही.
एमटीव्हीवर झळकण्याची इच्छा
जॅस्मिनने सर्जरी करुन घेतल्यानंतर स्वतःची काही छायाचित्र फेसबुकवर अपलोड केली आहेत. युट्यूबवरही व्हिडिओ अपलोड केला आहे. काही महिन्यांपूर्वी तिने सर्जरी करुन घेतली. त्यासाठी 20 हजार डॉलर साधारण 12 लाख रुपये खर्च आला होता. या सर्जरीसाठी तिने दोन वर्षे बचत केली होती. तिने आता एक टीव्ही क्रू हायर केला असून ती तिचा व्हिडिओ तयार करुन एमटीव्हीला पाठविणार आहे. तिला विश्वास आहे, की रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये तिला नक्की प्रवेश मिळेल. एकना एक दिवस ती टीव्हीवर झळकेल. तिने तिच्या फेसबुक पेजवर सांगितले आहे, की लवकरच मी जिम्मी किमेल शो आणि इन्साइड एडिशन सारख्या टीव्ही शो मध्ये झळकणार आहे.
सर्जरी करणार्‍या डॉक्टरने ओळख लपवली
जॅस्मिनने तिच्या छातीच्या मधोमध तिसरी ब्रेस्ट इम्प्लांट केली आहे. सिलिकॉन इम्प्लांट आणि पोटाच्या स्किन टिशूजच्या मदतीने हे करण्यात आले आहे. जॅस्मिनने सांगितले, की ऑपरेशन आधी तिने 50 पेक्षा जास्त डॉक्टरांशी संपर्क केला त्यानंतर तिच्यावरील आगळ्यावेगळ्या सर्जरीसाठी होकार देणारा सर्जन भेटला. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जन भेटणे हे अवघड काम होते, कारण हे नैतिकतेच्या विरोधात होते. ऑपरेशन आधी डॉक्टरने त्यांचे नाव उघड करणार नाही असा करार माझ्याकडून करुन घेतला. त्यांना हे ऑपरेशन केल्यानंतर आपण वादात अडकू अशी भीती वाटत होती.
चित्रपटातही दाखविण्यात आले ट्रिपल ब्रेस्ट
हॉलिवूड अॅक्शन हिरो अर्नोल्ड श्वार्जनेगर याच्या टोटल रिकॉल या चित्रपता एका महिलेला ट्रिपल ब्रेस्टमध्ये दाखविण्यात आले होते. 2012 मध्ये या चित्रपटाचा रिमेक तयार करण्यात आला तेव्हा देखील त्यात एका महिलेला असे दाखविण्यात आले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जॅस्मिनने अपलोड केलेली छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा युट्यूबवर अपलोड केलेला व्हिडिओ