पनामा जगातील असा देश आहे, जिथे प्री-ट्रायल डिटेंशन रेट अर्थातच 'खटला' सुरु होण्यापूर्वी तुरुंगात ठेवण्याचा दर जास्त आहे. म्हणजे शिक्षा सुनावण्यापूर्वीच सर्वाधिक गुन्हेगारांना तुरुंगात बंद केले जाते. एका फोटोग्राफरने येथील लो जोया तुरुंगातील कैद्यांचे आयुष्य कॅमे-यात कैद केले.
शिक्षा झालेली नसताना वर्षानु वर्षे तुरुंगात राहतात...
एकिकडे हा देश टॅक्ससाठी ओळखला जातो. तर दुसरीकडे क्रिमिनल जस्टिस सिस्टमवर प्रश्न उपस्थित होत आहे. येथील तुरुंग ओव्हर क्राऊडेड आहे. येथे शिक्षा सुनावण्यापूर्वी किंवा खटल्यापूर्वीच गुन्हेगारांना तुरुंगात बंद केले जाते आणि वर्षानु वर्षे त्यांना येथेच ठेवले जाते. एका रिपोर्टनुसार, अशा कैद्यांची संख्या 60 टक्के जास्त आहे.
इतकेच नव्हे तर, येथील कैद्यांना चांगल्या सुविधासुध्दा मिळत नाहीत. आरोग्यसेवासुध्दा त्यांना दिली जात नाही. मात्र, एका रिपोर्टनुसार, नवीन सिस्टम सुरु केली जात आहे, त्यामध्ये कैद्यांना ट्रायलशिवाय एका वर्षापेक्षा जास्त दिवस ठेवले जाऊ शकत नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा येथील तुरुंगातील लोकांची लाइफ...