(अल्कोहल सिंड्रोमने पीडित मुले)
अमेरिकेच्या दक्षिण डकोटामध्ये राहणा-या काही समुदयाचे शेकडो मुले विचित्र आजाराने पीडित आहेत. दक्षिण डकोटाच्या पिन रिज इंडियन रिझर्वेशनमध्ये प्रत्येक 4 पैकी एक मुलगा अल्कोहल सिंड्रोमने पीडित आहे. त्यामुळे त्यांचा मानसिक विकास योग्य होऊ शकत नाही आणि शरीराच्या इतर विकासातसुध्दा अडथळा येतो. याचे कारण आहे, की या मुलांना जन्म देणा-या महिलांनी प्रेग्नेंसीमध्ये दारूचे अधिक सेवन केले होते. त्यामुळे त्यांच्या पोटात वाढणा-या मुलांवर अल्कोहलचा परिणाम झाला.
येथे एका परिसरात मद्याच्या जवळपास 4 दुकाने आहेत. परंतु एका रिपोर्टनुसार, वर्षभरात 40 लाख बिअरच्या केनची विक्री झाली आहे. या शहराची लोकसंख्यादेखील खूप कमी आहे, म्हणून दारूचा इतका मोठा खप जास्त अतिशोक्ती मानला जातो. प्रेग्नेंसीदरम्यान महिलांच्या दारूच्या सेवनाने पोटातील बाळाच्या रक्तात सुध्दा अल्कोहलचे प्रमाण आढळून आले. अनेक मुलांना आयुष्य जगणेसुध्दा कठिण होते तर काही मुलांची उंची कमी होते.
नोरा बोसम नावाच्या एका नर्सने सांगितले, की मागील वर्षी जवळपास 100 अशाच मुलांनी जन्म घेतला. एका न्यूज सर्विससोबत बातचीत करताना त्यांनी सांगितले, की या परिस्थितीवर कुणी नियंत्रण आणले नाही तर येणा-या दिवसांची परिस्थिती फार वाईट होईल. मात्र काही परिसरात दारूची विक्री कायदेशीररित्या बॅन आहे. तरीदेखील येथे दारू विकली जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पीडित मुलांचे फोटो...