आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील भुताचे शहर, 10 वर्षापासून कोणीही राहत नाही या विषारी शहरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर आम्ही तुम्हाला सांगितले की अमेरिकेतील असे एक संपूर्ण शहर जेथे मागील 10 वर्षापासून एकही व्यक्ती राहत नाही तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. ओक्लाहोमात वसलेले पिशेर हे अमेरिकेतील सर्वात विषारी शहर मानले जाते. आज आम्ही तुम्हाला 10 वर्षापासून ओसाड बनलेल्या शहरांची सैर करवणार आहोत. आधी होते अमेरिकेतील बेस्ट सीटी, आता बनले विषारी...
अमेरिकेतील फोटो जर्नालिस्ट सेप लॉलेस जगातील अशा ठिकाणाचे फोटोज क्लिक करणे पसंत करतो ज्याला तुम्ही आम्ही विसरून गेलो आहोत. आपल्या नव्या प्रोजेक्टसाठी त्याने अमेरिकेतील ओक्लाहोमातील पिशेर टाउनचे फोटोग्राफ्स क्लिक केले. आज पिशेर अमेरिकेतील सर्वात विषारी शहर मानले जाते. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला पिशेर अमेरिकेतील टॉप मायनिंग इंडस्ट्रीजचे हब मानले जात होते. मात्र, 2009 साली हे शहर खाली करावे लागले. तेव्हापासून येथे कोणीही राहत नाही.
कधी होते ओक्लाहोमातील बेस्ट टाउन, आता बनलेय ओसाड...
1913 मध्ये ओक्लाहोमाचा डेवलपमेंट प्लान आखला जात होता तेव्हा पिशेरला इंडस्ट्रियल सेक्शनमध्ये टॉप स्थान दिले गेले. तेथे जिंक आणि लीड यासारखे मिनरल खूपच प्रमाणात होते. यामुळे तेथे वेगाने इंडस्ट्रियल सेक्टरची ग्रोथ झाली. 10 हजार लोकसंख्येच्या या टाऊनचे नाव पिशेर लीड कंपनीचे मालक ओलिवर पिशेर याच्या नावावरून ठेवले. मात्र यानंतर जे काही घडले त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
हवा, पाण्यासह सर्वच बनले विषारी...
इंडस्ट्रियल डेवलपमेंटच्या नावाखाली या शहराला विषारी बनवून टाकले. येथील हवा आणि पाणी विषारी बनले. जिंक आणि लीडच्या खोदाईमुळे येथील परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी घटक बाहेर पडू लागले. परिस्थिती एवढी खराब झाली की तेथे राहण्यालायक स्थिती उरली नाही. अखेर 2009 मध्ये पिशेर टाउन खाली करावे लागले.
पाहता पाहता शहर ओसाड झाले-
1996 पर्यंत पिशेरमध्ये राहणारे 34% मुले लीड पाईंजनिंगची शिकार ठरली. काही दिवसातच हे संपूर्ण खाली केले व आता ओसाड बनले. 10 वर्षानंतर क्लिक झालेले फोटोज सर्व काही परिस्थिती कथन करतात. या शहराला आता भुताचे शहर मानले जाते. मात्र तेथील सुंदरता आजही टिकून आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 10 वर्षापासून खाली असलेले पिशेर टाउनची निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...