एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बचन यांनी फेसबुकवर काही फोटो शेअर केले आहे. त्यात ते
आपली नात 'नव्या' सोबत दिसत आहेत. यामध्ये नव्या पिआनो वाजवताना दिसत असून बिग बी आपल्या या लाडक्या नातीला न्याहाळताना दिसत आहेत.
हे फोटो शेअर करुन बिग बी म्हणतात, ''या जगात एका आजोबासाठी यापेक्षा अधिक सुख काय असू शकते, की आपल्या नाती सोबत वेळ घालवून तिच्या सुप्त गुणांना अवगत करायला मिळते. जेव्हा नव्या बोटांनी मधुर संगीत वाजवते तेव्हा अस वाटते जणु मधाचीच धार आहे.''
नव्या ही अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन-नंदाची मुलगी आहे. श्वेताचे लग्न दिवंगत अभिनेते राजकपुर यांचा नातू आणि ऋतु नंदा यांचा मुलगा निखिल सोबत झाले आहे. निखिल आणि श्वेताला दोन मुले आहेत. मोठी मुलगी ही नव्या आहे तर त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य नंदा आहे.
नव्या ही 18 वर्षाची असून ती सध्या लंडन येथील सेवन ऑक्स स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे. सेवन ऑक्स स्कूलमध्येच बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा मोठा मुलगा आर्यनही शिक्षण घेत आहे. नव्या आणि आर्यन केवळ क्लासमेंट नसून ते दोघे चांगले मित्रसुद्धा आहेत. शाळेच्या गेट टू गेदर आणि ट्रिपच्या वेळेस दोघेही एकमेकांच्या सोबत दिसतात.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेले नव्याचे काही फोटो....