आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी ही तरुणी नाईटक्लबमध्ये करते डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस- अमेरिकेतील मार्लिना मोरेनो कधी काळी चिअरलीडर होती. त्यावेळी ती मॉडेलिंगही करीत होती. 2012 मध्ये ती आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली. तेव्हापासून तिचे आयुष्य बदलून गेले. आता ती वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी काम करते. त्यासाठी तिने पिंक मंकी मीडिया या समाजसेवी संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून वन्यप्राण्यांवर डॉक्युमेंटरीही तयार केल्या जातात.
एवढे मोठे काम करणे मार्लिनासाठी सहज शक्य नव्हते. आर्थिक समस्या तर होतीच. तिने नाईटक्लबमध्ये डान्स करण्यास सुरवात केली. त्यातून मिळालेल्या पैशांमधून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. या पैशांमधून ती जगभरातील वेगवेगळ्या जंगलांनाही भेटी देते. आतापर्यंत आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील आठ देशांमध्ये ती फिरली आहे.
24 वर्षांची मार्लिना सांगते, की मी लहानपणी फार समस्या फेस केल्या. आर्थिक प्रश्न असल्याने पर्यटनावर जास्त खर्च करणे शक्य नव्हते. मोठी झाल्यावर मी मॉडेलिंग आणि चिअरलिडरचे काम करु लागले. पण माझे क्षेत्र जरा वेगळे होते. आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली तेव्हा जाणवले, की मला वन्यप्राणी आवडतात. त्यांच्यासाठी काही काम केले पाहिजे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मार्लिना मोरेनोचे वेगवेगळ्या प्राण्यांसोबतचे फोटो...