आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाचे वैभव असलेले सर्वाधिक मंदिरे-स्मारकांचे शहर...पाहा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या हुकुमशाहीसाठी कुप्रसिद्ध, एक मागास आणि अत्यंत गरीब देश अशी ओळख असलेला एकमेव देश आहे ज्यामध्ये, सर्वाधिक मंदिरे आणि प्राचीन स्मारके आहेत. त्याचे नाव आहे 'बगान'. बगान म्यानमारचे एक प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.

दुस-या शतकाच्या आसपास हे शहर वसले होते. पण नवव्या आणि 13 व्या शतकात या शहराला खरी ओळख मिळाली होती. याच काळात हे शहर म्यानमारचे प्रमुख साम्राज्य असलेल्या पगान (Pagan) ची राजधानी बनले होते. या शहरातील स्तूप, पगोडा आणि इतर स्मारके पाहण्यासाठी जगभरातील लोक याठिकाणी येतात. त्यामुळे याला जगाचे वैभव म्हटले तरी, चालेल.

बगान ही तत्कालीन म्यानमारची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हालचालींचे केंद्र मानले जाते. 9 व्या शतकापासून 15 व्या शतकादरम्यान म्यानमारची स्थापत्य कला, धर्म आणि संस्कृतीचा सुवर्णकाळ होता. 11 व्या शतकापासून 13 व्या शतकाच्या काळात हजारोंच्या संख्येने बौद्ध मंदिरे, पगोडा आणि स्मारक तयार करण्यात आले. बगानमध्ये पसरलेली सुमारे 2200 मंदिरे, स्तूप आणि स्मारके आजही त्या कालखंडाच्या आठवणी ताज्या करतात.

बगान हे जगातील धोकादायक भूकंप प्रभावित क्षेत्रांपैकी एक असल्याचे मानले जाते. केवळ 1904 ते 1975 या काळात येथे लहान-मोठे असे 400 भूकंप झाले. यावरूनच याचा अंदाज लावता येऊ शकेल. तरीही शेकडो सुस्थितीत असलेली मंदिरे चांगल्या वास्तुरचनेची ओळख करुन देतात. पुढील स्लाइडवरुन आपल्याला जगातील या समृद्ध वारशाबाबत समाधान जाणवेल.

पुढील स्लाइडवर पाहा, बगानच्या प्राचीन वारसा स्थळांचे PHOTO