आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: असे आयुष्य जगतात हिप्पी, अनेकदा पार्ट्यात होतात नग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंपरा धूडकावून लावत वेगळ्या पध्दतीने आयुष्य जगणा-यांना हिप्पी म्हटले जाते. जगभरात हे लोक वेगवेगळे फेस्टिव्हलसुध्दा आयोजित करतात.
न्यूयॉर्क- एक अमेरिकन फोटोग्राफरने हिप्पीजचे फोटो क्लिक केले आहेत. जे लोक परंपरा नकारून आपल्या मर्जीने बिनधास्त आयुष्य जगण्यास पसंती देतात त्यांना हिप्पी म्हटले जाते. 80 वर्षीय प्रसिध्द फोटोग्राफर स्टीव्ह शॅपिरोने दाखवले, की मागील काळाच्या तुलनेत हिप्पीजच्या राहणीमानात बदल झाला आहे.
टाइम मासिकानुसार, आजचे हिप्पी मेडिटेशन, डान्स आणि योगा करणे पसंत करतात. अर्थातच पूर्वीच्या हिप्पीच्या तुलनेत हे विना ड्रग्सच्या आनंदात जगतात. शॅपिरोने हे फोटो स्वत:चे पुस्तक 'इन ब्लिस- एन एक्सप्लोरेशन ऑफ करेंट हिप्पी काऊंटर कल्चर अँड ट्रान्सफॉर्मेशनल फेस्टिव्हल'मध्ये पब्लिश केले आहे.
फोटोग्राफरने 'टाइम'सोबतच्या बातचीतमध्ये सांगितले, की हिप्पीजचे हे फोटो विविध देशांत झालेल्या बर्निंग मॅन फेस्टिव्हल, द रेनवे गॅदरिंग, इलेक्ट्रिक फॉरेस्टसारख्या इव्हेंटमध्ये क्लिक केले आहेत. त्याने सांगितले, की हे लोक कशाप्रकारे आयुष्य जगत आहेत आणि आयुष्याचा कसा आनंद घेत आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा त्यांच्या पार्ट्या खूपच वाइल्ड असतात, काही पार्ट्यात हे लोक नग्नसुध्दा होतात.
विविध देशांत फिरत असताना फोटोग्राफर मुलगा थिओफिलससोबत होते. फोटोग्राफरने सांगितले, की त्याचा मुलगा 23 वर्षांचा आहे आणि खूपच आध्यात्मिक आहे. तो अशा इव्हेंटमध्ये अॅक्टिव्ह होऊन सहभाग घेतो. मुलाच्या मदतीने फेस्टिव्हलमधील फोटो इतके उत्कृष्ट क्लिक करता आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हिप्पीजच्या आयुष्यातील PHOTOS...