आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिरॅमिड्स तर पाहिलेच असतील, पण इजिप्तमधली अशी लाईफ कधी पाहिली नसेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या शहराच्या संस्कृतीचा अंदाज फक्त तेथील ऐतिहासिक वस्तुंवरून येत नाही, तर सामाजिक जीवनावरून येत असतो. इजिप्तच्या बाबतीतही तेथील सामाजिक जीवन संस्कृतीबाबत बरेच काही बोलणारे आहे. 

साधारणपणे टुरिस्ट डेस्टीनेशन्सवर ऐतिहासिक स्थळे पाहिले जातात. लोक कधीही एखादे शहर पाहायला जात नाहीत. पण शहर पाहिले नाही, तर मग पर्यटन कसले. फक्त स्मारकांवरून शहराची इमेज तयार होत नाही. तेथील सामाजिक जीवनही महत्त्वाचे ठरत असते. इजिप्तमधील पिरॅमिट जगभरातील लोकांनी पाहिले आहेत. मग ते प्रत्यक्षात असो की, फोटोमध्ये. पण इजिप्तमधील लोकांचे रोजचे जीवन किती जणांनी पाहिले आहे, कदाचित फार कमी. 
 
फोटोग्राफरने दाखवली इजिप्तमधील लाईफ... 
- फोटोग्राफर साराह डी ने इजिप्तच्या डेली लाईफचे फोटो क्लिक केले आहेत. साराह मूळ ओटावा, कॅनडाची अवॉर्ड विनिंग फोटोग्राफर आहे. तिने दुबईच्या एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी काम केले आहे. 
- साराहने वॉक लाइक अॅन इजिप्शियन नावाच्या ब्लॉग पोस्टमध्ये काहिराचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात काहिरा, एखाद्या जुन्या भारतीय शहरासारखे दिसते. 
- काहिरातील बहुतांश लोक अपार्टमेंट्समध्ये राहतात. हे अपार्टमेंट्स साधारणपणे भुऱ्या रंगाच्या जुन्या इमारती असतात. केवळ श्रीमंत लोकच बंगल्यात राहतात. 
- काहिरामधील गल्ल्या अत्यंत अरुंद आहेत. त्यात ठिकठिकाणी मशिदी आणि अनेक प्रकारची दुकाने आहेत. दुकाने जुन्या पद्धतीची असून बरेच सामान रस्त्यावरच असते. 
- विदेशी लोक वगळता बहुतांश महिला बुरख्यामध्ये दिसतात. काही लोक पारंपरिक वेशातही दिसतात. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, काहिराच्या सामान्य जनजीवनाचे इतर काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...