आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यंत संवेदनशील व कोमल मनाच्या प्राण्यांनाही कळते नात्याचे महत्त्व!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राण्यांचे मन नाजूक असते. ते बोलू शकत नाहीत. फक्त हावभावांनी मनातील भावना दर्शवतात. ते इतरांच्या वेदना समजू शकतात. बज फीड या अमेरिकन वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेले हे सहा किस्से वाचल्यानंतर प्राणी नात्यांना किती महत्त्व देतात, हे तुम्हालाही जाणवेल.

मित्राचा मृतदेह पाहून सारेच चिंपाझी शोकाकुल
2009 मध्ये कॅमरुनमधील चिंपांझी सेंटरमधील डोरोथी नावाचे एक 40 वर्षांचे माकड हृदयविकाराने मरण पावले होते. त्याच्या मृत्यूनंतरचे वातावरण थक्क करणारे ठरले. कर्मचारी डोरोथीचा मृतदेह घेऊन जात होते तेव्हा केंद्रातील सर्व चिंपांझी एकत्र जमा झाले. परस्परांना आलिंगन देत होते आणि अखेरीस मित्राला निरोप देण्यासाठी र्शद्धांजली देतात, तसे उभे राहिले होते. त्या वेळी रेस्क्यू सेंटरच्या कर्मचारी मोनिका जपीडर यांनी हा फोटो काढला होता. मोनिका यांच्या मते, 25 चिंपांझींचा हा समूह अजिबात शांत स्वभावाचा नव्हता. पण प्रथमच ते मान झुकवून असे उभे होते.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यातून कुत्र्याने अंध मालकांचे प्राण वाचवले'