आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा साप नव्हे! निसर्ग, सृष्टी जशी अद्भूत तशीच ती भीतीदायकही, पाहा फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरं तर आपण नेहमीच निसर्गाच्या सुंदरतेचे कौतूक करतो. मात्र, सृष्टीचे हे रूप जेवढे सुंदर आहे तेवढेच भीतीदायकही असते. आम्ही वादळ, महापूर किंवा भूकंपाबाबत बोलत नाही. ते तर विंध्वस घेऊन येतात. आम्ही बोलतोय सृष्टीवरील छोट्या-छोट्या जीवांबाबत आणि झाडे-फुलांबाबत. ते स्वत: किंवा त्यांची संरचना इतकी भीतीदायक असते की भल्या भल्यांना घाम फुटतो. पाहा छायाचित्रे....
 
- वरील छायाचित्रात हूबेहूब सापासारखा दिसणारा जीव साप वगैरे काही नाही. ना तो साप आहे ना त्यात काही विष आहे. ते तर तुम्हाला काहीही नुकसान करणार नाही एवढेच नव्हे तर त्यासारखे जीव तुम्ही हातात चिरघळून फेकून दिले असेल किंवा अजानतेपणे खाल्लेही असेल. 

- हे स्नेक हेड कॅटरपिलर आहे म्हणजे इल्ली. ती अशीच इल्ली, जी अनेकदा कोबी किंवा फळे काटताना दिसते. हीच इल्ली मोठी होऊन तितली किंवा मॉथ बनते. 

-स्नेक हेड कॅटरपिलर हेमरोप्लेन्स ट्रिप्टोलेमस नावाच्या मॉथ (तितलीसारखा कीडा) चे सुरुवातीचे रूप असते. शिका-यापासून बचाव होण्यासाठी याचा वापर केला जातो. 

- खरं तर इल्ली इतकी छोटी आणि मऊ असते की कोणतेही चिमणी व इतर जीव तिला खाऊ शकते. अशा शिकारीपासून वाचण्यासाठी या इल्लीने सापाचे रूप घेणे शिकले आहे. आपण या तथाकथित सापाच्या तोंडाच्या मागे पाहाल तर तुम्हाला तेथे पाय दिसतील.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सृष्टीतील आणखी काही भीतीदायक जीव-जंतू-पाने आणि त्यांच्या संरचनाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...