आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 वर्षांपासून बंद होता दरवाजा, उघडताच कुटुंब झाले मालामाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या अपार्टमेन्टमध्ये असा दरवाजा असेल, जो अनेक वर्षांपासून बंद आहे तर ती तुमच्यासाठी नशीब बदलणारी बाबा ठरू शकते. पॅरिसवर 1939 ला नाझिंनी आक्रमण केले, तेव्हा तिथे राहणारे लोक घर सोडून पळून गेले होते. यातील बहुतांश लोक बाहेरच स्थायिक झाले. ते परत इकडे फिरकलेच नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर हे त्यांचे घरं पुर्णपणे दुर्लक्षीत झाले. परंतु, एक परिवार अनेक वर्षांनंतर परत आला. त्यांनी घराचा दरवाजा उघडला, तेव्हा सर्वज आवाक् झाले...

मौल्यवान वस्तूंनी भरले होते घर...
पॅरिसमध्ये राहणाऱ्या मॅडम डी फ्लोरियन यांनी नाझिंच्या भितीने घर सोडले होते, तेव्हा त्या केवळ 3 वर्षाच्या होत्या. जीव वाचवण्यासाठी त्या तिथे निघून गेल्या जिथे नाझिंची भीती नव्हती. परत पॅरिसला येण्याची त्यांची आजिबात इच्छा नव्हती. 2010 मध्ये फ्लोरियन यांचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या परिवाराला कळाले की, गेल्या 70 वर्षांपासून फ्लोरियन पॅरिसमधील घराचे भाडे भरत होत्या. फ्लोरियनच्या परिवाराने अनेक वर्षांपासून बंद असलेल्या आपल्या घराचा दरवाज उघडला आणि सर्व जण अवाक् झाले. घरात पेंटिंग्स, अनेक मौल्यवान वस्तू आणि त्यावेळचे साहित्य भरलेले होते. त्या सर्व वस्तूंची किंमत कोटींच्या घरात होती.  

लिलावात कमवले करोडो रूपये...
फ्लोरियन यांच्या परिवाराने आपल्या या जुन्या घरातील अनेक वस्तूंचा लिलाव केला. यातील एक पेंटिंग 21 कोटींपेक्षा अधिक किमतीत विकली गेली. अनेक वर्षांनंतर उघडलेल्या घराने या परिवाराचे आयुष्यच बदलून टाकले.

पुढील स्लाइडवर पाहा आत काय काय होते...
बातम्या आणखी आहेत...