Home »Khabrein Jara Hat Ke» Area 51 Secret Airplane

एरिया 51- अमेरिकन गुप्त विमानांची स्मशानभूमी

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 14, 2013, 12:25 PM IST

  • एरिया 51- अमेरिकन गुप्त विमानांची स्मशानभूमी

अमेरिकेतील गुप्तचर संघटनांचे विमाने एवढे प्रगत आहेत की, सामान्य लोकांनी ते पाहिल्यास उडत्या तबकड्या पाहिल्याचा भास होतो. या विमानाचे आयुष्य संपल्यावर विघटन केले जात असेल, असे लोकांना वाटते; पण अमेरिकन संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना यात जोखीम वाटते. कारण विघटन केलेले विमान पुन्हा जोडून तयार केले जाऊ शकते. त्यामुळे अशी विमाने अनेक पद्धतींनी गुप्त ठेवली जातात. अनेक गुप्त विमानांचे हार्डवेअर अनेक दशके गुंडाळून ठेवले जातात.
काही गुप्त विमान सिक्रेट स्टोअरमध्ये लपवले जातात, तर काही मोजकीच विमाने संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जातात.
स्टेल्थ प्लेनमध्ये विषारी आणि संवेदनशील टेक्नॉलॉजी असल्यामुळे त्यांचे विघटन करणे कठीण असते. त्यामुळे असे अपघातग्रस्त झालेले विमान नागरी वसत्यांपासून कोसो दूर असलेल्या नेवादा येथील ग्रुन लेक टेस्ट साइट म्हणजेच एरिया - 51 मध्ये नेहमीसाठी पुरले जातात.
एरिया 51 मध्ये अमेरिकेतील सर्वाधिक अत्याधुनिक प्रोग्राम्सची टेस्टिंग केली जाते. ज्या विमानांचे नाव कधीही सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आले नाही, अशी विमाने येथे पुरण्यात आली आहेत. नेवादा डेझर्टमधील अनेक ठिकाणी अशी विमाने पुरण्यात आली आहेत. पण ही माहिती कुणाकडेही नाही. 1950 पासून आतापर्यंत येथे अशा प्रकारची 12 विमाने पुरण्यात आली आहेत. यात यू-2 स्पाय प्लेन, ए-12, एफ 101 चेस प्लेन (1965 मध्ये अपघात), दोन
लॉकहीड कन्सेप्ट एअरक्राफ्ट यांचा समावेश आहे. लॉकहीड विमान एफ 117 टेक्नॉलॉजीचे सादरीकरण करत असताना एरिया 51 मध्येच क्रॅश झाले होते. विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतिहासकार पीटर मार्लिन यांच्या मते, 2001 मध्ये पुरण्यात आलेल्या विमानांवर 600 दशलक्ष डॉलर ते 1 दशकोटी डॉलरपर्यंत खर्च करण्यात आला होता.

Next Article

Recommended