आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arizona Pastor Bob Larson Performs Peace Prayer Via Skype

SKYPE वर होत आहे शांतीपूजा, एका तासासाठी मोजावे लागतात 18,000 रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऍरिझोनाचे धर्मगुरू आता फारच हायटेक झाले आहेत. ऍरिझोनामध्ये आता SKYPE व्हिडीओ कॉलिंगद्वारे पूजा होत आहेत. ऍरिझोनातील धर्मगुरू बॉब लारसन आता लोकांना ऑनलाइन पूजेची सुविधा देत आहे. जे लोक त्यांच्या पर्यंत जाउ शकत नाहित ते SKYPE वरूनच पूजा करून घेत आहेत. अशी ऑनलाइन पूजा करण्यासाठी लारसनची एक तासाची फिस 18,000 रुपये आहे.
गेल्या चार शतकात 20 हजार शांती पूजा केल्याचे पादरी बॉब लारसन सांगतात. घर किंवा व्यक्तीला वाइट शक्तिपासून मुक्ती मिळण्यासाठी करण्यात येणा-या पूजेला शांती पूजा किंवा एक्सोरिझम म्हणतात. 60 मिनिटांच्या पूजेसाठी 295 डॉलर म्हणजे जवळजवळ 18490 रुपये मोजावे लागतात. या प्रकारचे अनेक व्हिडीओ देखील यु ट्युबवर उपलब्ध आहेत. इतर धर्मात अशी पूजा करण्यास मान्यता नाही. आंतरराष्ट्रीय कॅथलिक असोसिएशनच्यानूसार एक्सोरिझम ही पूजा इंटनेटवर करता येत नाही.