आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशिया खंडात प्रसिद्ध आहे भारतातील छोटे गाव, सर्व गावकरी बोलतात इंग्रजी भाषा, पाहा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेघालयमधील मावल्‍यान्‍नॉंग हे गाव आशिया खंडामध्‍ये सर्वात स्‍वच्‍छ गाव म्‍हणून ओळखले जाते. गावातील साक्षरतेचे प्रमाण 100 टक्‍के आहे. आश्चर्याची बाब म्‍हणजे गावातील सर्व लोकांना इंग्रजीमध्‍ये संवाद साधता येतो.
आशिया खंडातील सर्वात स्‍वच्‍छ आणि सुंदर गावाचा पुरस्‍कार मिळालेल्‍या या गावात पर्यटकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. वॉटर फॉल, लिविंग रूट ब्रीज याशिवाय या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. अशिया खंडातील सर्वात स्‍वच्‍छ गाव म्‍हणून अनेक डॉक्‍युमेंट्री तयार करण्‍यात आल्‍या आहेत.

मावल्‍यान्‍नॉंग गाव-
मेघालयच्‍या शिलॉंन्‍ग आणि भारत-बांग्‍लादेशाच्‍या सिमेपासून 90 किलोमीटर अंतरावर वसले आहे. 2014 च्‍या जनगणने नुसार या गावात 95 घरे आहेत. गावक-यांचा शेती हा मुख्‍य व्‍यावसाय आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात सुपारीचे उत्‍पादन घेतात. या गावातील गार्डन परमेश्वराची बाग म्‍हणून प्रसिद्ध आहे.
सुंदर गावाची फोटो पाहाण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...