आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Astronaut Michael Hopkins Takes Selfi At International Space Station During Spacewalk

नासाचे अंतराळवीरही सेल्फीचे चाहते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोन किंवा टॅब्लेट युर्जसचा सेल्फी क्लिक करणे हा छंदच होऊन गेला आहे. हा छंद आता अंतराळापर्यंत गेला आहे. नासाचे अंतराळवीर माइक हॉपकिन्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (आयएसएस) वर स्पेस वॉक करताना काही सेल्फी क्लिक केले. पृथ्वीच्या पार्श्वभूमीवर हे क्लिक केले. निळ्या रंगाची पृथ्वी आणि त्यांच्या हेल्मेटमध्ये सहकारी रिक मास्ट्रेचियो यांची दिसणारी प्रतिमा यामुळे फोटो अधिकच आकर्षक दिसत आहे.
माइक आणि रिक आयएसएसचा एक पंप मॉड्युल दुरुस्त करताना हे सेल्फी घेतले गेले. माइकने ट्विटरवर हा स्पेस सेल्फी शेअर केला. या फोटोला 974 प्रशंसकांनी रिट्विट केले. या अपलोडवर माइक लिहितात, ''मला विश्वास बसत नाही की, हा मीच आहे. हा अनुभव इतका अद्भुत आहे की, व्यक्त करण्यास शब्दच सापडत नाहीत.''
स्पेस वॉकिंगदरम्यान क्लिक करण्यात आलेले सेल्फी बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...