मेलबर्नः ऑस्ट्रेलियाच्या एका फाइन आर्ट फोटोग्राफरने काही जुन्या छायाचित्रांना आपल्या रिटचिंग स्किलने अतिशय सुंदर लूकमध्ये रुपांतरीत केले आहे. इंटरनेटवर या छायाचित्रांना पसंत केले जात आहे. जेने लांग नावाची ही फोटोग्राफर ब्रिसबेन येथे वास्तव्याला असून तिने 1930 आणि 40 च्या दशकात रोमानियन फोटोग्राफरने क्लिक केलेल्या छायाचित्रांना नवीन रुप दिले आहे.
खरं तर फोटोशॉपवर एडिट करण्यात आलेली छायाचित्रे नेहमीच सोशल साइट्सवर लोक शेअर करत असतात. मात्र ही छायाचित्रे अतिशय सुंदररित्या फोटोशॉपच्या मदतीने एडिट करण्यात आली आहे. जेने यांनी सांगितले, की ही छायाचित्रे त्यांनी केवळ एडिटच केली नाही, तर नवीन रुपातून त्याची एक कथा सांगण्याचाही प्रयत्न केला आहे. आपल्या कल्पनेतून या छायाचित्रांना नवीन रुप दिल्याचे जेने म्हणतात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जेने यांनी जुन्या छायाचित्रांना कसे नवीन रुप दिले...