बेजबाबदारपणामुळे मनुष्याचा आजार वाढत जातो. याचे उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाचे माउंट गँबियरमध्ये राहणारी तमारा मींग आहे. 29 वर्षाच्या तमाराला दिर्घकाळापासून जबड्यांमध्ये वेदना होत होत्या. परंतु तिने डॉक्टरांकडे जाणे टाळले. तिने केलेल्या दुर्लंक्षाचा परिणाम तिला 2012 मध्ये भागावा लागला. तोंड उघडण्यातही होतात वेदना...
सिंगल मदर असलेली 29 वर्षांची तमारा आपल्या मुलीसोबत माउंट गँबियरमध्ये राहते. तिला खुप दिवसांपासून जबड्यात वेदना होत होत्या. परंतु तिने दुर्लंक्ष केले. परंतु 2012 मध्ये तिला तिचे तोंडही उघडता येत नव्हते. शेवटी ती डेंटिस्टकडे के गेली, तर डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या जबड्याची डिस्क डिस्प्लेस झाली आहे. हे सांगून त्यांनी तिला फेशियल सर्जनकडे जाण्यास सांगितले. परंतु या डॉक्टरांनी तिचे आयुष्य नरक बनवून टाकले.
डॉक्टरांचा बेजबाबदारपणा
स्कॅनमध्ये असे दिसले की, तमाराला ऑस्टियोआर्थरायटिस होता. म्हणजेच तिच्या जॉइंट्सच्या मधले कार्टिलेज तुटले होते. यावर एकच उपचार होता की, तमाराच्या राइट जबडा प्रोस्थेटिक जॉइंट बदलावे. 2013 मध्ये तमाराने 10 लाख खर्च करुन जबडा रिप्लेस करण्याची सर्जरी केली. परंतु डॉक्टरांनी यापुर्वी तिची अॅलर्जी टेस्ट केली नाही. यामुळे तिच्या वेदना काही महिन्यांनंतर वाढल्या आणि स्किन अॅलर्जी झाली. चेह-यावर सूज आली. यानंतर असे कळाले की, तमाराला नीकल आणि कोबल्टपासून अॅलर्जी होती. हे दोन्हीही मेटल तिच्या प्रोस्थेटिक जॉइंटमध्ये होते. यामुळे तिचा त्रास वाढला.
दोन्ही जबडे केले रिप्लेस
2016 मध्ये तमाराच्या लेफ्ट जॉमध्ये वेदना झाल्या. डॉक्टरांनी हेसुध्दा रिप्लेस करण्यास सांगितले. यानंतर डॉक्टरांनी टायटेनियमने तयार केलेल्या जॉइंट्सचा वापर करुन तिची सर्जरी केली. परंतु तिरीही तिची परिस्थिती खराब होतेय. डॉक्टर्स सांगतात की, तिला पुन्हा जॉइंट रिप्लेस करावे लागतील. यासाठी खुप जास्त पैसै लागू शकतात. यामुळे तिच्या मित्रांनी सोशल साइट्वर मदतीची पोस्ट टाकली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कसे झाले तमाराचे हाल...