ऑस्ट्रेलियन तरुणी रेवी जेन हिने प्रेग्नेंसीच्या विविध टप्प्यांवरील स्वतःचे एक खास फोटोशूट केले. या युवतीचे हे अनोखं फोटोशूट इंस्टाग्रामवर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रेग्नेंट असताना आणि बाळंत झाल्यानंतर अशा दोन टप्प्यांमधील फरक दाखवणारं फोटोशूट जेनने केलं आहे. बाळंतपणानंतर पुन्हा ती मूळ कमनीय बांध्यात परत आली आहे.
रेवी ही ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिनं गोंडस मुलीला जन्म दिला. रेवीनं प्रेग्नेंसीच्या काळातील वेगवेगळा टप्पा दाखवणारे फोटोशूट केलंय. प्रेग्नेंसीच्या काळात बॉडी शेपमध्ये होणारा बदल दाखवणारी छायाचित्रे तिने इंस्टाग्रामवर शेअर केली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, रेवीने प्रेग्नेंसीच्या काळातील आणि प्रेग्नेंसीनंतरची क्लिक केलेली खास छायाचित्रे...