(जन्मानंतरचा बालिकेचा फोटो)
लंडन - जर एखाद्या बालिकेचा जन्म चौथ्या महिन्यातच झाला आणि तरीही ती सुखरुप वाचली तर त्याला चमत्कारच म्हणावे लागेल. इंग्लंडच्या सर्रे शहरातही असाच एक चमत्कार घडला आहे. येथे राहणा-या डेव्हीडच्या पत्नीने गर्भवती राहिल्यानंतर अवघ्या चौथ्या महिन्यात एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे ही बालिका आज पूर्णपणे निरोघी आयुष्य जगत आहे.
या बालिकेच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी डेव्हीडला सांगितले होते की, वेळेआधी बाळांतपण होत असल्याने या मुलीच्या जगण्याच्या शक्यता अत्यंत कमी आहेत. पण या बालिकेचा जन्म झाला आणि ती जिवंतही होती. त्यानंतर डॉक्टरांनी या चिमुकलीला चार महिने चाइल्ड केयर यूनिट (CCU) मध्ये ठेवले. त्यानंतर हळू-हळू जेव्हा तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली त्यानंतर तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
त्यानंतर या चिमुकलीसाठी घरीच सर्व व्यवस्था करण्यात आली. त्याठिकाणी नळीच्या सहाय्याने तिला ऑक्सिजन पुरवठा केला जात होता. आता ही बालिका सुमारे एका वर्षाची झाली आहे. तिच्या जन्माची तारीख व इतर माहिती मात्र उपलब्ध नाही.
पुढील स्लाइड्वर पाहा...हळू हळू धोक्यातून बाहेर येण्याच्या या चिमुकलीच्या प्रवासाचे PHOTOS