आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी \'नरक\' आहे हा देश, 4 साक्षीदार असले तरच मानला जातो बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो सादरीकरणासाठी वापरण्यात आला आहे)
साऊदी अरबमध्ये 900 महिला महापालिका निवडणूकीसाठी कॅम्पेन करत आहेत. साऊदी अरबच्या इतिहासात 12 डिसेंबरला पहिल्यांदा हजारो महिला निवडणूकीत मतदान करणार आहेत. यानिमित्तावर आम्ही तुम्हाला आज अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्या येथील महिलांसाठी बॅन आहेत.
रियाद- महिलांच्या कार चालवण्याविषयी असो अथवा त्यांनी मनमोकळे जगण्याविषयी असो. साऊदी अरबमध्ये कडक नियम महिलांना हवे तसे आयुष्य जगण्याचा अधिकार देत नाही. त्यामुळे या रिपोर्टमध्ये साऊदी अरबला महिलांसाठी 'नरक' म्हटले आहे.
दिर्घकाळानंतर महिलांना मिळाला मतदान करण्याचा अधिकार-
ब्रिटनमध्ये 1918मध्ये तर न्यूझिलँडमध्ये 1893मध्येच महिलांना मतदानात भाग घेण्याच अधिकार देण्यात आला आहे. त्याच्या जवळपास एका दशकानंतर 2011मध्ये किंग अब्दुल्लाने महिलांना काही अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. ते आता लागू करण्यात आले आहेत. मात्र सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, शासनाने यावेळी दोन महिलांची उमेदवारी रद्द केली आहे, या दोन्ही महिला आपल्या कार्यामुळे प्रसिध्द आहेत. म्हणून हा देश खरंच महिलांना हक्क देण्याची इच्छा दाखवत आहे, याला आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोका असल्याचे नजरेने पाहिले जात आहे.
13 लाख पुरुष तर 1.3 लाख महिला-
इतक्या वर्षांनंतर मिळालेल्या हक्कानंतरसुध्दा जवळपास 7000 उमेदवारांच्या तुलनेत महिलांची संख्या 900 आहे. दुसरीकडे, 13 लाख पुरुषांच्या तुलनेत केवळ 1 लाख 31 हजार महिलांची मतदान यादीत नावे आहेत. महिलांमध्ये जागृता अभियान चालवले नसल्याने साऊदी अरबवर टिकासुध्दा होत आहे. ही निवडणूक परिषदेच्या अर्धा जागांसाठी (284)साठी होत आहे. इतर अर्ध्या जागांवर किंगचे प्रतिनिधी असतात. म्हणून निवडणूक होऊनदेखील साऊदी अरबची खरी सत्ता राजाच्या हातातच असते. तसे पाहता, नगर परिषद केवळ साफ-सफाईसारखे छोटे-मोठे कामच पाहते.
काय-काय आहे महिलांसाठी बॅन...

सार्वजनिक ठिकाणी परपुरुषाला भेटू शकत नाही महिला-
साऊदी अरबमध्ये महिलांची स्थिती आणि त्यांनी किती स्वातंत्र आहे, हे एकाच गोष्टीवरून लक्षात येते. महिला सार्वजनिक ठिकाणी परपुरुषाला भेटू शकत नाहीत. महिला केवळ कुटुंबातील पुरुषांसोबतच दिसल्या पाहिजे. महिला जेव्हा घराबाहेर पडतील तेव्हा घरातील एकतरी पुरुष त्यांच्यासोबत असायला हवा. हा नियम पाळलासुध्दा जातो. जर या नियमाचे पालन झाले नाही तर महिलांना शिक्षा दिली जाते. त्यात त्यांना मारहाणसुध्दा केली जाते. साऊदीमध्ये अनेक घरांत, शाळेत, यूनिव्हर्सिटी आणि वर्कप्लेसच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे दार बनवण्यात आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या साऊदी अरबच्या महिलांसाठी कोण-कोणत्या गोष्टी बॅन आहेत...
बातम्या आणखी आहेत...