वाघा वाघाची शिकार करत नाही असे म्हटले जाते. हे उदाहरण यासाठी दिले जाते कारण कोणताच प्राणी माणवाप्रमाणे
आपापसात लढत नाही. मात्र केनियाच्या जंगलात एका सिंह मादिसाठी दोन 'नर' सिंह मात्र आपापसात लढताना आढळले. हे दोन्ही सिंह एकमेकांच्या जीवावर उठले होते. जो पर्यंत यापैकी एका सिंहाचा पराभव होत नाही तोपर्यंत या सिंहानमध्ये घमासान युद्ध सुरू होते.
जंगलातील या 'नर'सिंहाच्या युद्धाची फोटो टिपली आहेत वाइल्ड लाइफ फोटोग्राफर मार्गोट रॅग्गेटने. एक सिंह आणि मादाचे मिलन होत असल्याचे माहिती त्यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच सफारी घेऊन मार्गोट या जंगलात पोहचले. मात्र त्यांना सिंह कूठेच दिसत नव्हते.
दुपारनंतर परत जंगलातून बाहेर पडत असताना त्यांना एक मादा सिंह दिसला. तिचा जोडीदार कुठे आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मार्गोटला तिच्यापासून काही अतंरावर दोन सिंह दिसले. यापैकी एका सिंहाकडे मादा सिंह जात होती. तिच्या जोडीदार सिंहाला मात्र याचा राग आला आसावा. त्याने दुस-या सिंहावर हल्ला चढवला. यानंतर दोघांमध्ये बराचवेळ रनकंदन सुरू होते. यापैकी एका सिंहाचा पराभव झाला. दुसरा सिंह 'सिंहिणीसोबत जंगलात निघून गेला.
पुढील स्लाईडवर पाहा 'नर' सिंहांची लढाई...