आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा एका सिंहिणीला इम्प्रेस करण्यासाठी होतं दोन सिंहात जोरदार भांडण, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमनून अ‍ॅनिमल लव्हर्सना अभायरण्यामध्ये शक्तीशाली आणि विश्रांती घेणारे सिंह भेटतात. परंतु मागील काही दिवसांपूर्वी जिम्बाब्वेच्या हाँग राष्ट्रीय पार्कमध्ये वेगळाच नजारा बघायला मिळाला. दोन सिंहाच्या डरकाळीने सर्व पार्क हादरून गेले होते. एका सिंहिणीला प्रभावित करण्यासाठी या दोन शक्तीशाली सिंहांमध्ये लढाई सुरू झाली. जवळपास 20 सेकंदाच्या या लढाईत काळ्या केसांच्या सिंहाने दुस-या सिंहाला जमीनीवर आपटले.
इंग्रजी साइट डेली मेलनुसार, या भयावग लढाईच्या क्षणांना 64 वर्षीय छायाचित्रकार केनेथ वाटकिंसने आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. केंटच्या सिडकपचा रहिवाशी केनेथ आपल्या पत्नीसह हाँग राष्ट्रीय पार्कमध्ये फिरण्यासाठी आला होता. केनेथ सांगतो, की त्याने या लढाईला जवळपास 30 फुट अंतरावरून कॅमे-यात कैद केले.
केनेथ सांगतो, 'सिंहांचे डरकाळी अजूनही कानात घूमत आहे. युध्द स्थळापासून आमच्या सफारीचे अंतर इतके कमी होते, की त्यांच्या डरकाळीने आमचा थरकाप उडायचा. दोन्ही शक्ताशाली सिंह एका सिंहीणसाठी आपसात भांडत होते. हे भांडण केवळ 20 सेकंद चालू होते. या कमी कालावधीतच या दोन्ही सिंहांनी एकमेकांवर जोरात वार केले. या भांडणात सुरूवातीपासूनच काळ्या केसांच्या सिंहाचा दबदबा कायम होता.'
केनेथ पुढे सांगतो, 'या भयावह लढाईत सिंहांच्या शरीरावर काही ठिकाणी खरचटले होते. परंतु छायाचित्रामध्ये तुम्ही बघू शकता. कसे काळ्या केसांच्या सिंहाने दुस-या सिंहावर पंजाने घातक वार केले. पहिल्या सिंहाचा पंजा दुस-या सिंहाच्या डोळ्यावर लागला. स्पष्ट आहे, की या सिंहाऐवजी दुसरा प्राणी असता तर आतापर्यंत त्याचा मृत्यू झाला असता.'
केनेथने सांगितल्याप्रमाणे, 'या लढाईवेळी मी माझ्या पत्नीआणि गार्डसह हाँग राष्ट्रीय पार्कच्या न्वेश्ला पिकनीक साइटवर सफारीमध्ये होते.'
केनेथ एक इन्शुरन्स कंसल्टेट आहे. त्याने सांगितले, 'एकदा काळ्या केसांच्या सिंहाने दुस-या सिंहाचा पराभव केल्यानंतर तो शांत झाला. 15 वर्षे अभायरण्यात भटकंती केली परंतु असा प्रसंग पहिल्यांदाच बघितला.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा दोन सिंहामधील भयावह लढाईची छायाचित्रे...