आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beautiful Blue Eyed Babies Photos Went Viral On Social Media

ही चिमुकली क्षणांत झाली लोकप्रिय, पाहा तिच्या निळ्याभोर डोळ्यांचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका आठ महिन्यांच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. निळेभोर डोळे आणि गोंडस चेह-याच्या या मुलीचे लोकांने वेड लावले आहे. तिचा निरागस चेहरा सर्वाही सांगतो. तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर लोकांना दीवाने केले आहे.
या चिमुकलीचे नाव इजेप्त आहे. तिचे आई-वडील रॅपर असून ते ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये राहतात. इजेप्तच्या वडिलांचे नाव फॉर्टोफाई असून आईचे नाव शाना इव्हर्स आहे. ही जोडी रॅपिंग करते. या चिमुकलीचे फोटो इंटरनेटवर पोस्ट करताच काही क्षणांत लोकप्रिय झाले. तिला लाखो लोकांनी फॉलो केले. सध्या तिचे एक लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या चिमुकलीच्या सौंदर्याचे हॉलिवूडची कर्दाशिअन फॅमिलीसुध्दा दीवानी झाली आहे. कर्दाशिअन बहिणींनी ही छायाचित्रे पोस्ट झाल्यानंतर आपल्या अकाऊंटवर रि-पोस्ट केले तेव्हा या फोटोचे लाइक्स झपाट्याने वाढायला लागले होते. फोर्टेफाईचे मूळ नाव रातुमैतवुकी आहे. त्याने सांगितले, 'मी आणि माझी पत्नी शाना आमच्या मुलीला मिळणारे लाइक्स पाहून अवाक झालो. आम्हाला आश्चर्य वाटले, की कर्दाशिअल बहिणींनी आमच्या चिमुकलीला एका नोट लिहून पाठवले. त्यासोबतच त्यांनी एक कर्दाशिअन किड्स ब्रांड्सचे काही कपडेसुध्दा पाठवले.'
या चिमुकलीची आई किम कर्दाशिअनसारखी दिसते, तिला नेहमी अशा कॉम्प्लीमेंट मिळतात. महत्वाचे म्हणजे, मुलीला तिच्यापेक्षा जास्त लाइक्स आणि कॉम्प्लीमेंट्स मिळत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या निळ्याभोर डोळ्यांच्या आणि सुंदर चेह-याच्या चिमुकलीचे निरागस PHOTOS...