आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beautiful Iranian Women Protest Strict Hijab Laws

PHOTOS: या तरुणी इराणच्या कायद्याची अमेरिकेत अशी उडवताहेत खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इंटरनेटवर खुल्या केसांमध्ये फोटो शेअर करून विरोध करणारी तरुणी)
इराणच्या त्या देशांपैकी एक आहे, जिथे इस्लामिक हिजाब घालणे महिलांसाठी अनिवार्य आहे. परंतु काही तरुणींनी त्याचा विरोध करण्याचा ठाम निश्चय केला आहे. 2014च्या आकड्यांनुसार, इराणच्या मोरलिटी पोलिसांनी वर्षभरात जवळपास 36 लाख महिलांना धमकावले, दंड ठोकला आणि अटक केली आहे. पोलिसांनी या महिलांवर तोडके कपडे परिधान केल्याचा आरोप लावला आहे. आता अमेरिकेमध्ये राहत असलेल्या ईरानी अॅक्टीव्हिस्ट आणि जर्नालिस्ट मसीह अलिनेजादने या हिजाब घालण्याच्या प्रथेला बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हिडिओ झाला VIRAL-
मसीह एक व्हिडिओमध्ये तरुणींना स्वातंत्र्य जगण्यासाठी अपील करताना दिसत आहे. व्हिडिओला इंटरनेटवर 5 दिवसांत लाखो लोकांनी पाहिले. मसीहने सोशल साइट्स पेजवरसुध्दा महिलांना मोकळ्या केसांमधील फोटो शेअर करण्यास सांगितले आहे. तिच्या असे सांगण्यानंतर अनेक महिलांनी असे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे. मसीह या अंदोलनाची सुरुवात करून आपल्या गाव आणि कुटुंबीविषयी सांगते, कशाप्रकारे तिच्या भावाला फिरण्यास, जगण्यास, कपडे परिधान करण्यास स्वातंत्र्य होते. परंतु तिच्यासाठी यातील एकही नव्हत.
सोशल साइट्सवर असलेल्या पेजवर महिलांनी एकपेक्षा एक सुंदर फोटो पोस्ट केले आहेत आणि अनेक फोटो इराणी कायद्याची खुलेआम खिल्ली उडवणारे आहे. जसे की, एका महिलेने एका भिंतीजवळ केस मोकळे करून फोटो काढला आहे, आणि त्याच भिंतीवर लिहिले आहे, 'महिलांनी कशाप्रकारे कपडे परिधान करीवे.' मसीह सांगते, 'माझी आई मला स्कार्फ घालायची. पण मला ते आवडत नव्हते. इराणमध्ये दोन्ही विचारांच्या लोकांसाठी स्वातंत्र्य हवे. माझा भाऊ स्वातंत्र्याचा प्रतिक होता, तो त्याच्या मर्जीनुसार जिथे हवे तिथे फिरू शकत होता. परंतु मी असे करू शकत नव्हते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इराणी कायद्याची खिल्ली उडवतानाच्या तरुणींचे PHOTOS...