आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Beautiful Russian Teacher Forced To Quit Job Because Of Her Hot Photos On Instagram

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या शिक्षिकेसाठी सौंदर्यच बनला शाप, चुकवावी लागली एवढी मोठी किंमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्‍येक महिलेला सुंदर दिसण्‍याची इच्‍छा असते. मात्र त्‍याच कारणामुळे त्‍यांची नौकरी गेली तर? रशियामध्‍ये असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका नर्सरी शाळेच्‍या शिक्षिकेला ती अतिशय सुंदर असल्‍यामुळे शाळेतून काढून टाकण्‍याचा निर्णय मॅनेजमेंटने घेतला आहे. या सुंदर शिक्षिकेमुळे मुलांच्‍या मनात चुकीच्‍या भावना निर्माण होत होत्‍या, असे कारण मॅनेजमेंटनी सांगितले आहे.

 

फोटोंमुळे झाली कारवाई

व्हिक्‍टोरिया डेमेस्‍कीना असे या शिक्षिकेचे नाव असून ती रशियातील येकातेरिनबर्ग शहरात राहते. येथील एका नर्सरी शाळेत ती शिक्षिका म्‍हणून काम करत होती. व्हिक्‍टोरिया यांनी आपले अनेक ग्‍लॅमरस फोटो इंस्‍टाग्रामवरही अपलोड केले आहेत. याच फोटोंच्‍या आधारे शाळेने त्‍यांच्‍यावर कारवाई केली आहे. त्‍यांच्‍यानूसार हे फोटो फार सेक्‍शुअल होते. शाळेच्‍या मुख्‍य अधिका-यापर्यंत त्‍याची तक्रार करण्‍यात आली होती. शेवटी मॅनेजमेंटने त्‍यांना हे फोटो डिलिट करण्‍यास सांगितले होते. मात्र व्हिक्‍टोरिया यांनी यास नकार दिला. त्‍यामुळे त्‍यांना शाळेतून काढून टाकण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.


सहका-यांनी दिल्‍या अशा रिअॅक्‍शन
शाळेतील व्हिक्‍टोरियाच्‍या इतर स‍हका-यांनीही यावर आपले मत प्रदर्शित केले आहे. ते म्‍हणाले की, आम्‍हीही सोशल मिडीयावर फोटो शेअर करत असतो. मात्र असे नाही. शि‍क्षकाने याबाबतीत जबाबदार असले पाहिजे. दुसरीकडे जॉबवरुन काढल्‍यानंतर व्हि‍क्‍टोरीया दुस-या जॉबच्‍या शोधात आहे.


पुढील स्‍लाइडवर पाहा ते फोटोज ज्‍यामुळे व्हि‍क्‍टोरिया यांना शाळेतून काढण्‍यात आले....  

 

बातम्या आणखी आहेत...