आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Beautiful Russian Teacher Forced To Quit Job Because Of Her Hot Photos On Instagram

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौंदर्यच ठरले या टिचरसाठी घातक, अशी मोजावी लागली किंमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौंदर्य हे कोणाला नको असते. मात्र सुंदर दिसण्यामुळे कोणाला नोकरी गमवावी लागली तर? होय, हे खरं आहे. या महिलेला तिच्या सौंदर्यामुळे नोकरी गमवावी लागली आहे. रशियाच्या एका नर्सर स्कूलमध्ये टिचर असलेल्या या महिलेला मॅनेजमेंटने कामावरुन काढून टाकले आहे. त्यासाठी कारण देण्यात आले की टिचरच्या सौंदर्यामुळे मुलांच्या बाल मनावर वाईट परिणाम होत आहे. 

 

इंस्टाग्राम फोटोज ठरले कारण.. 
आजच्या युगात प्रत्येक जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात जर तुम्ही सुंदर असाल तर विचारायलाच नको. रशियातील येकातेरिनबर्ग शहरातील 26 वर्षांची व्हिक्टोरिया डेमेस्किना ही तरुणीही इतरांप्रमाणे मॉडर्न राहाते आणि सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. त्यासोबतच ती येकातेरिनबर्ग शहरातील एका नर्सरी स्कूलमध्ये टिचर होती. तरुणीने तिचे अनेक ग्लॅमरस फोटोज इन्साग्रामवर अपलोड केले आहेत. हे फोटोज पाहूनच स्कूल मॅनेजमेंटने तरुणीला नोकरीवरुन काढून टाकले आहे. 
- झाले असे, की शाळेत शिकणाऱ्या काही मुलांच्या पालकांनी टिचरचे इन्सावरील काही फोटो पाहिले ते अतिशय मादक आणि सेक्शुअल होते. यामुळे पालकांनी शाळा प्रशासनाकडे टिचरची कंप्लेन केली. शाळा प्रशासनाने व्हिक्टोरियाला 'ते' फोटो डिलिट करण्यासा सांगितले, मात्र व्हिक्टोरियाने त्याला नकार दिला. त्यानंतर मॅनेजमेंटने टिचरलाच शाळेतून काढून टाकले. 

 

सहकाऱ्यांनीही दिली नाही साथ 
- या प्रकरणात व्हिक्टोरियासोबत काम करणाऱ्या तिच्या सहकारी टिचर्सनेही तिला साथ दिली नाही. एका कलीगने सांगितल्यानुसार, ती देखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. मात्र स्पोर्ट्स किंवा काही चांगले काम करतानाचे फोटोज अपलोड करते. एका टिचरने एवढे जबाबदार असले पाहिजे, अशी आपेक्षाही तिने व्यक्त केली. 
- शाळेतून नारळ मिळाल्यानंतर व्हिक्टोरिया आता नव्या जॉबच्या शोधात आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोणत्या फोटोजमुळे गमावली नोकरी... 

बातम्या आणखी आहेत...